shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अँड.कविता मोहरकर यांचे कला क्षेत्रा सोबतच सामाजिक कार्यात योगदान मोलाचे !


चंद्रपूर◼️किरण घाटे◼️
विदर्भाच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अधिवक्ता कविता मोहरकर यांनी आज पावेतो पार पाडलेल्या विविध सौंदर्य स्पर्धेत भाग घेवून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. पती विनेश लोखंडे हायकोर्टाला वकील आहेत. त्या सुद्धा पेशाने वकील आहेत. 

त्यांना दोन जुळी मुले आहे . मुलगा कविश व मुलगी किमया अठरा वर्षाची असुन ती बारावी झाली आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून थेट अधिवक्ता कविता मोहरकरने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व करताना दक्षिण कोरियातील सेऊल येथे पार पडलेल्या मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनलच्या स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स २०२१ चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविला आहे.घरगुती व बाहेरची जबाबदारी सांभाळून आपली आवड जोपासणे इतकं सोपे नाही. 

सन २०११ मध्ये मिसेस गडचिरोली म्हणून नावाजलेल्या कविता मोहरकर यांची सन २०१८पर्यंत कलागुणांत बरीच गॅप पडली. नंतर सन २००० मध्ये त्यांचा वकिली व्यवसाय सुरू झाला .आणि तो सुरूच  आहे. त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या कलागुणांना कधीच दूर सारले नाही .सर्वच क्षेत्रात  कविताचा फार मोठा जीवन प्रवास आजही बघायला  मिळतोय आहे. त्यांच्या जीवन प्रवासात स्वताच्या कलेला समोर आणताना आयुष्यात कितीतरी त्रास त्यांना सहन करावा    लागला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अनेक कलागुणांचा त्यांना दांडगा अनुभव आहे.           

◼️मनात कोणताच किंतु- परंतु न ठेवता  त्यांनी कला क्षेत्रातील आपल्या सर्वच कला आज पर्यंत जोपासल्या आहे .त्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहे. त्यांनी मेहनत, जिद्द, महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वासाच्या भरोश्यावर हे उत्तुंग शिखर गाठले आहे .   त्यांनी जेव्हा सौंदर्य स्पर्धेतील   सुंदर सुंदर मुली पाहिल्या त्यांची श्रीमंती पाहिली आणि त्यांना वाटलं मी एक सर्वसाधारण कुटुंबातील आहे .खूप काही सुंदर नाही मला जमेल का ?हा प्रश्न त्यांच्या मनात कधीच आला नाही .सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या कलेत होतीच . 

काय आश्चर्य !त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व करताना दक्षिण कोरियातील सेऊल येथे पार पडलेल्या मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनल स्पर्धेत विशेष युनिव्हर्स २०२१ चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविला. फॅशन आयकॉन, बेस्ट टॅलेंटचे अवार्ड बेस्ट स्पोकन स्टाईल आयकॉन अशा दहा-बारा स्पर्धेच्या त्या परिक्षक देखिल  राहिल्या आहेत. कवितांनी २२ जूनला साउथ कोरियाला देशाचे प्रतिनिधित्व करून एकदा परत भारताची मान उंचावली. त्यांनी शंभर देशातून प्रेझेंटेशन राऊंड मध्ये अव्वल क्रमांक पटकाविला ,  उंच भरारी मारली. इतकेच नाही तर  कौटुंबिक हिंसाचाराबाबत त्यांनी आपला बुलंद आवाज उठविला ,त्यांची वक्तृत्व शैली वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भागातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहे.याच अतिदुर्गम भागात मासिक पाळीच्या बायकांना गावाबाहेर पाच दिवस बंद खोलीत ठेवतात ही प्रथा त्यांची अजूनही सुरुच आहे . त्या त्यासाठी त्यांनी आपला आवाज उठवला आहे. त्यांनी त्या महिलांची व्यथा जाणत  त्यांचे व्हिडिओ घेतले, इंटरव्यू घेतले. त्यांना वाटलं आपण काहीच करू शकत नाही .खरे तर त्यांनीच या बाबतीत आवाज उठवायला पाहिजे त्या शिक्षित झाल्या पाहिजेत .जोपर्यंत त्या स्वतः शिक्षित होणार नाहीत स्वतः आवाज उठवणार नाहीत तोवर परिस्थिती ही अशीच राहणार. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे असे कविता मोहरकर यांना वाटते .  याच मासिक धर्मातून  बाळाचा जन्म होतो. मग याला  दुर का सारतात याचा विटाळ का मानतात?असा प्रश्न देखिल कवितांनी केला आहे.


 त्यांची शॉर्ट फिल्म (खुशिया अधूरी आचल की) यात त्यांच्या अभिनयाने आज अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे.  मॅक्झिनच्या कव्हर पेजवर आज त्या झळकतात. अप्सरा इंडिया मुंबईला सौंदर्य स्पर्धेत त्या सेलिब्रेटी होत्या. त्यांना ब्राऊन स्पेशल अवार्ड मिसेस युनिव्हर्स (साऊथ एशिया पॅसिफिक) आणि दुसरा मिसेस युनिव्हर्स (वरसिटी) त्यांच्या कलागुणाने भारताची वाहवा  झाली आहे. त्यांच्या सांगण्यावरून बाहेर देशातही त्यांना चांगलेच अनुभव आले .त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली बाहेरही त्यांचं कौतुक झालं. ऍडव्होकेट  कविता मोहरकर यांनी आपल्या भारत देशाची आपल्या मायभूमीची मान उंचावली.हे तेवढेच सत्य आहे.               


वकील, सूत्रसंचालन, लेखिका, मोटिवेशन, स्पीकर, कवयित्री, मॉडेल व अभिनेत्री एवढ्या सगळ्या भूमिका त्यांनी आज पर्यंत पार पाडल्या. अजुनही त्यांचा कला क्षेत्रात प्रवास असाच सुरु आहे. सर्व कला जोपासताना आयुष्यातील चढ उताराला न घाबरतात त्यांनी यशाचा पल्ला गाठला हे विशेष ! मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर त्या मार्गातून कुणीच अडवू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्या महिलांसाठी आज ही एक प्रेरणास्थान आहेत.कला क्षेत्रा सोबतच  सामाजिक क्षेत्रात देखिल अधिवक्ता कविता मोहरकर  यांना फार मोठी आवड आहे. कोणत्याही क्षेत्रात  त्या आज  मागे नाही. परिश्रम करण्याची क्षमता व मनात जिद्द असली की निश्चितच आपण यशाचा शिखर गाठू शकतो .अश्या अधिवक्ता कविता मोहरकर एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या .त्यांची मुलाखत नागपूरच्या राधा खानझोडे यांनी नुकतीच घेतली त्यांनी या मुलाखत दरम्यान आपले अनुभव त्यांचे जवळ कथन केले.

◼️अधिवक्ता कविता मोहरकर ह्या एक सहज सुचलं व्यासपीठाच्या एक सदस्य असून अनेकांनी त्यांचे कार्याची प्रशंसा केली आहे.
close