प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : १२ / धार्मिक व सामाजिक चळवळ समृद्ध व्हावी या मंगल भावनेतून रविवार दि . २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.०० वा. हुतात्मा स्मृति मंदिर सोलापूर येथे जीवन गौरव व समाजत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे .
सकल दिगंबर जैन समाज सोलापूरच्या वतीने सोलापूर निवासी समाजहितैषी, श्रावकरत्न व श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, सोलापूर या संस्थेचे विश्वस्त धर्मानुरागी श्रीमान दिपक जम्बुकुमार शहा यांना त्यांच्या अमृत महोत्सवपूर्ती वर्षानिमित्त व त्यांच्या धार्मिक व सामाजिक सेवेबद्दल "जीवनगौरव पुरस्कार" तसेच सोलापूरचे सुपुत्र, मुनिभक्त, मुनिसेवक, उद्योजक, धर्मानुरागी श्रीमान अनिल पवनकुमार जमगे यांना भारतवर्षीय दि. जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या आजपर्यंतच्या धार्मिक व सामाजिक सेवेबद्दल "समाजरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित रहावे असे सकल दिगंबर जैन समाज व पुरस्कार गौरव समितीच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आले आहे .

