सामाजिक उपक्रमातून समाजाशी बांधलकी निर्माण होते - जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १२ / समाजातील कायदा व्यवस्था राखण्या बरोबरच नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम पोलिस चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमातून समाजाशी बांधिलकी ठेवण्याचे काम होत आहे.
दिंडी, सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यात सहभागी होत गरजूंना मदतीचा हात देण्याचे कामही पोलिस करत आहेत. कोरोना काळातील त्यांच्या सेवेचे सर्वांनीच कौतुक केले. या कार्यात पोलिस बॉईज असोसिएशनही पुढाकार घेत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. प्रत्येकाने आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून काम केले पाहिजे. आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून खर्या अर्थाने वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.
जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने स्टेशन रोड येथील गरजूंना अल्पोपहार व पाणी बाटलीचे वाटप केले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, संजय जाधव, संजय लष्कर, सतीश मुंडलीक, संतोष जाधव, संतोष सासवडे, वसिम सर, विजय काळे, नंदकुमार साबळे, किरण शिंदे, गणेश लष्कर, जोएल शिंदे, संदिप काळे, किरण भापकर, संतोष तुपे, शेखर मुळे, राजू अडसूळ, अविनाश भोईटे, संदिप गायकवाड, मुकुंद औटी, तुषार अडसूळ, प्रतिक खंडागळे, अमोल आगळे, राहुल हिवाळे, दिप खंडागळे, गौरव चव्हाण, अशोक बडगु, हर्षद खंडागळे, प्रकाश येणारे आदि उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष नितीन खंडागळे म्हणाले, पोलिस बॉईज असोसिएशनच्यवतीने नेहमीच पोलिसांच्या पाल्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्पर्धां परिक्षांसाठी मार्गदर्शन, भरतीपूर्व प्रशिक्षण, याबरोबरच तज्ञांचे मार्गदर्शन अशा उपक्रमात पोलिस दलाचे मोठे सहकार्य मिळत असते. आज पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त स्टेशन परिसरातील गरजूंना नाष्टा व पाणी बाटली देऊन सामाजिक दायित्व जपले आहे. श्री.मनोज पाटील यांचे असोशिएशनला नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये होत असलेल्या रोजगार मेळाव्यास पोलिसांच्या पाल्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री.खंडागळे यांनी केले.
प्रारंभी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचे पोलिस अधिक्षक कार्यालयात जाऊन असोशिएशनच्यावतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. उपक्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले .

