इंदापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा आम्ही फडकवणार - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस
अजित पवार यांच्या उपस्थितीत आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे येथे आढावा बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजित पवार यांच्या कृपाशीर्वादाने इंदापूर शहराला भरघोस निधी आणल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा आम्ही फडकवणार असे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी
इंदापूर नगरपालिकेच्या संदर्भात अजित पवार यांनी आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचारले असता सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.
रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मार्गदर्शनाखाली आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले होते.
यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी माझी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आपापल्या भागात कामाला लागण्याचे सूतोवाच केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये प्रदीप गारटकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, आ.दिलीप मोहिते, आ.अशोक बापू पवार, रमेश थोरात, दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, जगन्नाथ शेवाळे इत्यादी मान्यवर व इंदापूर शहरातून मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, निखिल बाब्रस, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक वसंतराव मालुजकर, नगरसेवक स्वप्नील राऊत, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

