लोकांशी निगडित असलेले नाविन्यपूर्ण व्यवसायामध्ये युवकांनी उतरून जीवन यशस्वी करावे - अमोलराजे इंगळे.
इंदापूर प्रतिनिधी: सध्याच्या काळामध्ये लोकांना आवडेल, त्यांना गरज असलेल्या सेवा सुविधांचा विचार करून लोकांशी निगडित असलेले नाविन्यपूर्ण व्यवसायामध्ये युवकांनी उतरून जीवन यशस्वी करावे. इंदापूर येथे द हेअर वर्ल्ड युनेक्स सलोन या १४ व्यां शाखेचे उद्घाटन समारंभ दिनांक ११ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सर्व मित्र परिवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवा उद्योजक प्रवीण निकम, शुभम गायकवाड, सुनील नलवडे, महेश (राजाभाऊ) ताटे, अशोक पवार, महेंद्र कडवळे, आप्पा कोकरे , राहुल धोत्रे, राहुल फलफले, एडवोकेट नितीन राजगुरू, सुरेश पवार, गणेश पवार, अवधूत पवार, विलास गलांडे तसेच मित्र परिवार इत्यादी उपस्थित होते.
इंदापूर येथील बस स्थानकातील एका गळ्यामध्ये द हेअर वर्ल्ड युनेक्स सलोन हे अत्याधुनिक सुविधानयुक्त युवा उद्योजक प्रवीण निकम यांच्या माध्यमातून इंदापूरकरांच्या सेवेसाठी १४ व्या शाखेचे उद्घाटन अक्षय बागल व गणेश मोरे यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने रचना बाजार बस स्टॅन्ड इंदापूर येथील गळ्यामध्ये अतिशय आकर्षक अशा पद्धतीने सजावट केलेल्या या व्यवसायाचे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी उपस्थिती दर्शवून आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,या व्यवसायाचे मालक प्रवीण निकम , अक्षय बागल व गणेश मोरे यांना या व्यवसायास शुभेच्छा. सदर नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडून सध्याच्या काळामध्ये लोकांना आवडेल, त्यांना गरज असलेल्या सेवा सुविधांचा विचार करून लोकांशी निगडित असलेले नाविन्यपूर्ण व्यवसायामध्ये युवकांनी उतरून जीवन यशस्वी करावे आणि ते कार्य या व्यवसायातून यशस्वीतेने घडेल असा संकल्प करून मोरे व बागल यांनी हा व्यवसाय निवडला त्याबद्दल त्यांचे माझ्या व अमोल राजे मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून या व्यवसायामध्ये भरभराटी होऊन जीवनामध्ये वृद्धी व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो.
सर्व उपस्थित मान्यवरांचे मित्र परिवाराचे स्वागत करून आभार व्यवसायाचे मालक अक्षय बागल व गणेश मोरे यांनी मानले.

