shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढणार - अमर पाटील!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्या अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुका केज तालुक्यात काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
           
जिल्ह्यात व तालुक्यात काँग्रेसच्या विचाराचा व पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे परंतु अनेक निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे निवडणूक लढण्याची संधी मिळू शकल्या नाहीत मात्र यावेळी केज तालुक्यात सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस चांगले व स्वच्छ चेहरे देऊन एक चांगला पर्याय मतदारांना देणार असून सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसला तालुक्यातील मतदार नक्की स्वीकारतील असा विश्र्वास अमर पाटील यांनी बोलून दाखवला आहे. 
-------------------------------

उसाच्या राजकारणाला आता बळी पडण्याची गरज नाही - अमर पाटील
                
तालुक्यात सतत केवळ ऊसाच्या नावाखाली राजकारण सुरू आहे मात्र आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही गंगा माऊली शुगर सारखा एक चांगला व शेतकऱ्यांना न्याय देणारा कारखाना उभा राहिला असून येत्या हंगामात हा कारखाना मोठया ताकतीने गाळप करणार आहे त्यामुळे यापुढे ऊसाची कोणतीही अडचण शेतकऱ्यांना येणार नसल्याचेही अमर पाटील म्हणाले.
-------------------------------
close