प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
संघर्ष माजी सैनिक केज च्या अध्यक्षपदी येथील माजी सैनिक अजिमोद्दीन शेख यांनी निवड झाली असून सचिव पदी हनुमंत भोसले यांची निवड करण्यात आली.
केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेची बैठक येथील भोसले ब्रिल्लीअन्स क्लासेस च्या हॉल मध्ये माजी अध्यक्ष भागवत धपाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वसंमतीने वरील घोषणा करण्यात आली. केज तालुक्यात 400 हुन अधिक माजी सैनिक असून या माजी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी संघर्ष माजी सैनिक संघटना गेली 25 वर्षांपासून कार्यरत आहे. यापुढे माजी सैनिकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे बैठकीत ठरले.
या बैठकीत अध्यक्षपदी शेख अजिमोद्दीन खयामोद्दीन यांची तर सचिव पदी हनुमंत शिवाजीराव भोसले यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या उर्वरित पदावर उपाध्यक्ष - राम प्रभू राऊत,
सहसचिव- राजेंद्र रामकीसन बारगजे, कोषाध्यक्ष- सदाशिव राजाराम मस्के तर सदस्यपदी विठ्ठल नामदेव केदार, संग्राम भिकाजी आरकडे, नवनाथ कुंडलिक गायकवाड, यांची निवड करण्यात आली. माजी व आजी सैनिकांच्या कल्याणासाठी मोठे कार्य करण्याचा निर्धार नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. नवीन कार्यकारिणीचे माजी सैनिक व नागरिकांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
या माजी सैनिक मेळाव्यास माजी सैनिक चंद्रकांत गुळभिले, भागवत सिरसट, जयसिंग हंडीबाग, लक्ष्मण चाळक, राजेभाऊ मोरे, नवनाथ बारगजे, पी एन डापकर, जयद्रथ मस्के, एस जाधव, एस आर मस्के, व्हिपी सिरसाट, राम कदम, एम आर वाळके, रघुनाथ घुले, अशोक जाधव, राजेंद्र राऊत, बजरंग जाधव, विक्रम घुले, नामदेव केदार, श्रीमंत मगर, शफीयोद्दीन शेख, शिवरतन ठोके, बबन ढाकणे, अनिल सपाटे, नारायण शिंदे, भागवत धपाटे, श्रीमंत नखाते इत्यादीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन हनुमंत भोसले यांनी केले तर आभार राम राऊत यांनी मानले.

