shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत संत भगवानबाबांना अभिवादन*..!

*भिमाई आश्रमशाळेत संत भगवानबाबांना अभिवादन*..!

*ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची १२६  जयंती साजरी*.
*इंदापूर* :-( दि.२९)  भगवान बाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका कृतिशील समाजसुधारकाची होती. भगवान बाबांनी बहुजन समाजात समता, बंधुता,  एकात्मता रुजविण्यासाठी  सातत्याने प्रयत्न केले. बाबांचे किर्तन सर्व सामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडत असे .
असे गौरोद्गार बाबांच्या जयंती दिनी सहशिक्षक नानासाहेब सानप यांनी काढले.
बहुजन समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे, प्रबोधनाचा महामेरू, ऐश्वर्यसंपन्न संत, थोर समाजसुधारक संत भगवान बाबांची १२६ वी जयंती छोटेखानी भिमाई आश्रमशाळेत साजरी करण्यात आली.
त्यावेळी सहशिक्षक सानप सर बोलत होते. 
यावेळी ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या प्रतिमेस भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. साहेबराव पवार सरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 यावेळी  विद्यार्थी, शिक्षक-  शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.
close