shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोरगे पाटील बहुऊद्देशिय फाऊंडेशनने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली - किशोर निर्मळ

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील मोरगे पाटील बहुऊद्देशिय फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करुन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ यांनी केले.

मोरगे पाटील बहुऊद्देशिय फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री.निर्मळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा प्रतिष्ठानचे रावसाहेब तोडमल हे होते.

सकाळ मिडीया समूहाने महाराष्ट्र आयडॉल भूमिपूत्र गौरवाने पुरस्कारीत केल्याबद्दल श्री.किशोर निर्मळ यांचा सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर दूध संस्थेचे व्हा.चेअरमनपदी शिवाजीराव मोरगे आणि गोंधवणी सोसायटीच्या संचालकपदी विजय मोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केल्याबद्दल कु.श्रद्धा राजेंद्र सोनवणे हिचा गौरव करणेत आला. तर धार्मिक परिक्रमा पूर्ण करणारे बाबासाहेब मोरगे, प्रकाश पवार, संजय मोरगे, रमेश नवले यांचाही सत्कार करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक सचिन शिंदे व त्यांचे सहकारी यांचा प्रमुख पाहुणे श्री.किशोर निर्मळ, रावसाहेब तोडमल, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सतिष मोरगे यांचे हस्ते पावसाळी कॅप व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात श्री.रावसाहेब तोडमल म्हणाले की, मोरगे पाटील बहुऊद्देशिय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगे पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे बंधूभाव वाढीस लागला आहे. बांधकाम कामगार उन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता सतत काम करत असतो. त्यांच्या कामाची दखल घेऊनया कामगारांचा सन्मान केला, हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. गव्हर्मेट कॉन्ट्रॅक्टर श्री.सतिष मोरगे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास आप्पासाहेब मोरगे, सोपानराव मोरगे, दादासाहेब मोरगे, सतिष मोरगे, सतिष हुडे, संजय संचेती, ऋषीकेश नाबरीया, शशिकांत अमोलीक, सतिष दळे, विकी मोरगे, शुभम आढाव, तेजस मोरगे, सिद्धार्थ मोरगे, सोमनाथ शिंदे, रवि बिहाणी आदी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे वामन मोरगे यांनी आभार मानले.
close