राजगुरूनगर : कारगिल विजय दिनानिमित्त राजगुरूनगर येथे कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मृती स्थळावर १९७१ च्या युद्धातील भारतीय विजेता योद्धा, राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त सुभेदार देवराम मिंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सर्व माजी सैनिकांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू, सुखदेव व भगतसिंग यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 'भारत माता कि जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद' च्या घोषणांनी स्मृतिस्थळ परिसर दुमदुमून गेला.
त्रिदल सैनिक सेवा संघ खेड तालुका अध्यक्ष प्रविण कातोरे, कार्याध्यक्ष सुभेदार चंद्रशेखर जाधव, उपाध्यक्ष नायक संजय कौदरे, खजिनदार चंद्रकांत पोखरकर, सल्लगार सुभेदार दिलीप ढगे, राष्ट्रवादी सैनिक सेल खेड तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय सुक्रे, राजेश तांबे, रामदास पालेकर, मनोज धायबर,
भैरवनाथ सैनिक संघटना संविदणे अध्यक्ष अनिल लंघे, सुभेदार चंद्रशेखर जाधव, सुभेदार बबन बोऱ्हाडे, हवालदार विकास पवळे, हवालदार नवनाथ दौड़कर, हवालदार महादू वाळुंज, हवालदार आनंद खंडागळे, हवालदार पोपट गोपाळे, संदीप टाकळकर, महिला अध्यक्ष जयश्रीताई ढगे, कार्याध्यक्ष ज्योतीताई बाबळे, शोभाताई मोरे, सुजाता दौंडकर आदी माजी सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाऊ कौदरे, हुतात्मा सोशल फाउंडेशन अध्यक्षा मनिषाताई पवळे, मधुकर गिलबिले गुरुजी, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, क्रांतिवीर राजगुरू संघाचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, संजय शांताराम घुमटकर, हभप शरद महाराज थोरात, पत्रकार सुनिल थिगळे, श्री. आंधळे सर, नितीन वरकड, संदिप जाधव, स्वप्नील घुमटकर आदी मान्यवरांसह एक क्षण हुतात्मासाठीची सर्व टिम, पर्यावरण जागर प्रतिष्ठान व खेड तालुका त्रिदल सैनिक सेवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0000

