कै.रामभाऊ पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठीआज सकाळी ९ वाजता इंदापूर पंचायत समिती सभागृहात शोक सभेचे आयोजन...
महेंद्र रेडके व शशिकांत तरंगे यांनी केले आवाहन.
इंदापूर प्रतिनिधी: धष्टपुष्ट शरीररचना, धुरंधर राजकारणी, कर्तबगार व्यक्तीमत्व, अनेकांचे आधारस्तंभ, स्पष्टवक्ता, मार्गदर्शक,लोकप्रिय नेतृत्व लासुर्णे गावाचे माजी सरपंच,मा. पंचायत समिती सदस्य कै. प्रतापराव उर्फ रामभाऊ पाटील ह्यांचे अचानक दि.१८ जुन २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
इंदापूर तालुक्याच्या राजकारणात रामभाऊ पाटीलांनी इंदापूर पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पद, लासुर्णे गावचे सरपंच पद व इतर ही संस्थांची अनेक संचालकपदं भुषविली. भाऊंची इंदापूर तालुक्याच्या राजकारणात १९९० ते २०१० पर्यंत खुप मोठी छाप राहीली होती. नंतर २०२१ ची ग्रामपंचायत निवडणुक १७-०० अशी निवडून आणली होती. त्यांच्या कुटुंबातील अमोल पाटील हे त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. त्यांचे पुतणे डॉ. मंगेश पाटील हे वैद्यकीय सेवा बजावत आहेत. प्रतापराव उर्फ रामभाऊ पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत निष्ठेने राहिले होते.
रामभाऊ पाटील जरी राजकारणी असले तरी राजकारणा बरोबरच त्यांचा शेती व शिक्षणावर भर असायचा.
वडिलधारी लोकांपैकी अतिशय आपुलकी असलेला व योग्य मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ हरपला. हिच भाऊंना शब्दरूपी आदरांजली..!
शनिवारी दि.30 जुलै पंचायत समिती सभागृहामध्ये सकाळी ९ वा. कै. रामभाऊ पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्र रेडके व शशिकांत तरंगे यांनी केले आहे.

