shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

विविध विषयांवर करण्यात आले मार्गदर्शन

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १५ /   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अहमदनगर,  यांच्या तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. १५ जुलै २०२२ रोजी करण्यात आले होते.

 सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. सुधाकर यार्लगड्डा हे होते.सदरील कार्यक्रमात बेटी बचाव,बेटी पढाव,बालकांचे अधिकार, बालकांचा शिक्षणाचा अधिकार या विविध विषयांवर मार्गदर्शन श्रीमती भाग्यश्री पाटील , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये कोणते कामकाज चालते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी व महिलांसाठी देण्यात येणाऱ्या विधी सेवांवर मार्गदर्शन केले. त्यांनी विधी सेवा प्राधिकरणा मार्फत चालणाऱ्या योजनांचा मागोवा घेतला.सर्व ग्रामसेवकांना लोकअदालती बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामसेविका व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री सुधाकर यार्लगड्डा यांनी ग्रामसेवकांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा दूत बनण्याचे आवाहन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भारती पाठक,कनिष्ठ लिपिक , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.विकास कर्डिले, कनिष्ठ लिपिक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले.
 कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
close