shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळामहादेव सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.मंगल पवार, व्हा.चेअरमनपदी मनोज गवळी बिनविरोध..!


श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : माजी आ.भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गटाचे ताब्यात असलेल्या आणि तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची, दरवर्षी १०० टक्के वसूली होणार्‍या वडाळामहादेव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सौ.मंगल अनिल पवार यांची, तर व्हा.चेअरमनपदी मनोज बाळासाहेब गवळी यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.

सौ.मंगल अनिल पवार


     मनोज बाळासाहेब गवळी

श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन पदासाठी सौ.मंगल अनिल पवार यांच्या नावाची सूचना रोहिदास रंगनाथ कसार यांनी मांडली, त्यास धनंजय ज्ञानदेव पवार यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमन पदासाठी मनोज बाळासाहेब गवळी यांच्या नावाची सूचना बाळासाहेब ज्ञानदेव कसार यांनी मांडली, त्यास बाबासाहेब खंडू अभंग यांनी अनुमोदन दिले. वरील पदासाठी प्रत्येक एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.रुद्राक्षे यांनी जाहीर केले. वडाळामहादेव सोसायटी ही तालुक्यातील अग्रगण्य संस्था असून संस्थेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सभासदांना सर्वाधिक लाभांश वाटणारी सेवा संस्था म्हणून संस्थेचा तालुक्यात नावलौकीक आहे. सभेस संस्थेचे संचालक धनंजय पवार, दिलीप पवार, बाळासाहेब कसार, रोहिदास कसार, बाबासाहेब अभंग, अनिता कसार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.रुद्राक्षे यांना संस्थेचे सचिव संदीप रोकडे यांनी सहाय्य केले.

या निवडी प्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कसार, माणिकराव पवार, सुनिल कुदळे, शरद पवार, वेडू कसार, बाळासाहेब उघडे, पाराजी गोंदकर, लक्ष्मण उघडे, रावसाहेब उघडे, ज्ञानदेव वालतुरे, सर्जेराव पवार, बाबासाहेब पवार, बापुसाहेब गायकवाड, प्रफुल्ल पवार, नानासाहेब गायकवाड, रमाकांत राऊत सर, विशाल पवार, निवृत्ती गायकवाड, कुंडलिक साबळे, रेवणनाथ गायकवाड, बाबासाहेब शंकर पवार, विठ्ठल अनारसे, भानुदास राऊत, नवनाथ शिंदे, राजेंद्र भाकरे, प्रकाश राऊत, हनुमान राऊत, वसंतराव पवार, नारायण भाकरे, भाऊसाहेब अभंग, सुनिल कसार, विजय राठोड, शाम राठोड, शहाराम राऊत, विठ्ठल अनारसे, साहेबराव लगे, बाळासाहेब कसार, राजेंद्र पवार, कांता राठोड, गजानन कसार, अनिल अनारसे, मुकुंद पवार, माजी सरपंच अर्चना गायकवाड, वैशाली पवार, योगेश अभंग, सिताराम कसार, भागवत भोंडगे, संतोष कसार, संपत पवार, जितेंद्र कसार, भाऊसाहेब अभंग, संतोष कुदळे, माणिक पवार, रघुनाथ राऊत, पांडूरंग सातपुते, गुलाब सय्यद, प्रभाकर पवार, कैलास उघडे, प्रदिप कसार, अमोल पवार, बाबासाहेब गायकवाड, रवि गायकवाड, प्रशांत पवार, बाबासाहेब उघडे, अशोक पवार, शिवाजी राशिनकर, सुधाकर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, अ.नगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी यांनी अभिनंदन केले.
close