चंद्रपूर -किरण घाटे -
चंद्रपूर समिपच्या उर्जानगर येथे श्री संताजी स्नेही मंडळ, ऊर्जानगर यांच्या वतीने नुकताच वर्षा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.आयोजित कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता दिनेश चोधरी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते .या शिवाय याच स्नेहमिलन सोहळ्याला प्रशांत भट,विजय अमृतकर, जिल्हाध्यक्ष तैलिक महिला यलगार संघटना चंद्रपूरच्या चंदाताई इटनकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
या कार्यक्रम निमित्ताने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते .सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखिल करण्यात आला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संताजी स्नेही मंडळ, ऊर्जानगरचे अध्यक्ष प्रशांत भट, सचिव सुरेशजी कावळे, गोहणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



.jpeg)
