----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
चार चाकी गाडीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी एका तरुणास लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.
या बाबतची माहिती अशी की, दि ४ जुलै सोमवार रोजी किशोर नाईकवाडे हे केज पंचायत समितीच्या प्रांगणातील रस्त्याने मधून दुपारी २:३० वाजता घराकडे पायी जात असताना विकास लोखंडे यांचे व नारायण तांदळे नावाच्या व्यक्ती सोबत भांडण चालु होते. येथे लोकांची गर्दी जमलेली होती. किशोर नाईकवाडे हे तेथुन जात असताना विकास लोखंडे याने त्याची स्विफ्ट कार पाठीमागे रिव्हर्स घेत असताना किशोर नाईकवाडे याना गाडीचा धक्का लागला; म्हणून किशोर नाईकवाडे हे विकास लोखंडे याला म्हणालो की गाडी नीट चालव. असे म्हणताच विकास लोखंडे व त्याचा भाऊ दिपक लोखंडे हे किशोर नाईकवाडे याना म्हणाले की तुच रस्त्याने नीट चल तुला डोळे नाहीत काय? असे म्हणुन दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
त्यांना मला शिव्या देवु नका असे म्हणताच विकास लोखंडे याने किशोर नाईकवाडे यास लाथाबुक्याने मारहाण आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यात किशोर नाईकवाडे यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे. त्या नंतर विकास लोखंडे व दिपक लोखंडे हे म्हणाले आमचे नादी लागू नकोस नाहीतर जिवे मारून टाकु अशी धमकी दिली.
दि. ५ जुलै किशोर नाईकवाडे यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून विकास लोखंडे व दिपक लोखंडे यांच्या विरुद्ध गु.र. नं. २७६/२०२२ भा दं वि ३२४, ३२३, ५०४ ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक महावीर सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.
-----------------------------------

