shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा चे वतीने दिंडीचे आयोजन!

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा चे वतीने दिंडीचे आयोजन!       
 इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र ही साधु-संताची भूमी याच महाराष्ट्राच्या भूमीत पंढरपूर चा विठ्ठल म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत , आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाचे लाखो भाविक पढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी जातात.सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बावडा गावी झाले.यानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत दिंडीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची ,रुक्मिणीची, संत तुकाराम  , भालदार ,चोपदार व वारकरी वेशभूषा करुन पाहाणारांची अगदी मने जिंकली . वारीतील वारकरी ,बावडा गाव व आसपासच्या परीसरातील पालक व लोक , एवढेच नव्हेतर मोठमोठे पोलिस अधिकारी ज्यावेळेस या वेशभूषेतील विद्यार्थ्यांन समवेत फोटो काढत होते त्यावेळेस मन अगदी भरुन आले होतेआणि सर्व वातावरण अगदी भक्तीमय झाले होते असे भासत होते जणू काही विठ्ठलाची पंढरीच बावडा गावात अवतरली आहे.विद्यालयातील या दिंडी सोहळ्यास राजकीय, शैक्षणिक ,प्रशासकीय क्षेत्रातील आनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनचे कौतूक केले .

यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे सचालक  उदयसिंह पाटील,बावडा गावचे सरपंच  किरण पाटील,श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष  मनोज पाटील ,  आशोक घोगरे ,सहकार महर्षी कारखान्याचे संचालक  महादेव घाडगे, विकास पाटील ,संस्थेचे संचालक  स्वप्नील घोगरे ,माजी सचिव  सुधीर पाटील,पाटील परीवारातील जेष्ठ मार्गदर्शक विश्वास पाटील , बावडा गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी ,मान्यवर व पालक वर्ग मोठ्या सख्येने उपस्थित होता. या स्वागत दिंडीचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोगरे डी आर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे  उपप्राचार्य श्री जगताप जी जे ,पर्यवेक्षक श्री हासे डी व्ही श्री बनकर पी टी ,श्री पाटील डी ए उपस्थित होते.दिंडीचे नियोजन श्री मुलाणी एस टी ,श्री फडतरे एच एल ,श्री यादव एस आर,श्री माने पी बी , श्री सातपुते डी एल , श्री माने बी जी , श्री घोगरे एम टी , श्री शेख आर जे ग्रंथपाल श्री शामदेव घोगरे,सौ सय्यद एस आर, सौ घोगरे पी ए, सौ कवडे एस एस कु खतीब पी एस,सौ करळे मॕडम या अध्यापक बंधु-भगिनिंनी केले छायांकन श्री मुलाणी एजी व श्री अकील कांबळे यांनी केले .शिक्षकेतर कर्मचारी श्री सूरज कांबळे ,श्री नितीन घाडगे ,श्री हाजारे विजय श्री शिंदे एस एन , श्री कुर्डे तात्या यांचेही सहकार्य लाभले. या अनोख्या  उपक्रमाचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे  सहकार व संसदीय कार्यमंत्री  श्री हर्षवर्धन  पाटील  , पुणे जिल्हा परीषद सदस्या  सौ अंकीताताई पाटील-ठाकरे, युवकांचे आधारस्तंभ  राजवर्धन पाटील यांनी कौतुक केले.
close