shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांचा वाढदिवस म्हणजे एक अष्टपैलू, जनसामान्यांच्या दिलदार व्यक्तिमत्वाचा..!!

संगमनेर । प्रतिनिधी :-
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. 

              गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर कृषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम,छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीउत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते.

          विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन, ग्रामीण भागातील पाणी,रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिका.साकुर पठार भागातील राजकीय पुढारी खड्डेमय रस्त्यांबाबत गप्प असताना निवडक साथीदारांसोबत खड्डेमय रस्तावर व्रुक्षलागड आंदोलनाच्या  माध्यमातून अनोखे जन आंदोलन उभारण्याचे  काम केले.

           पठार भागातील वरवंडी गाव जवळपास ५५०० लोकसंख्या... नेटवर्कची नेहमीच अनुप्लब्धता...एकीकडे लोकप्रतिनिधींकडून टोलवाटोलवीची ऊत्तर मिळत असताना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून दोन महिन्यांत यशस्वी पाठपुरावा करुन नेटवर्क टाँवरचे काम सुरू झाले... आजरोजी वरवंडी नेटवर्क युक्त झालेले आहे.जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत. 

       सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरूण, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सदैव उपलब्ध असणारे व्यक्तीमत्व म्हणजेच शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन  तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे.

         शिवश्री राहुल बाजीराव पा. ढेंबरे  यांना मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक-२०२२ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.०९/०७/२०२२ रोजी पठार भागातील ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचा कोवीडमुळे म्रुत्यु झाला,अशा विद्यार्थ्यांना तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा विद्यार्थ्यांना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे...

             अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या 'शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह' नेटवर्क परिवाराकडून शिवमय शुभेच्छा...!
close