◼️चंद्रपूर-◼️किरण घाटे-◼️
सुपरिचित मराठी व हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र अशोक केदार यांचे अनेक चित्रपट फिल्म जगत मध्ये गाजले असुन त्यांच्या काही चित्रपटांनी चांगलाच व्यवसाय केला आहे.तर ब-याच चित्रपटांना प्रेक्षकांनी आपली पहिली पसंती दिली आहे. महाराष्ट्राला वेड लावणारा असा हा बॉलीवूड हिंदी व मराठी फिल्म अभिनेता आदिवासी (पारधी) समाजाची सेवा करीत राहणार असल्याचे मनोगत त्यांनी एका मुलाखती दरम्यान नुकतेच आपल्या बोलण्यातून व्यक्त केले आहे.
◼️कलाकार राजेंद्रजी केदार हे चित्रपट सृष्टीत अधिक परिश्रम घेणारे एक कलावंत असुन ते आपल्या संवादातुन कधी हास्याचे कारंजे उडवितात तर कधी डोळ्यांतुन अश्रु देखिल पाडतात. बालपणापासूनच कॉमेडी करण्याचं वेड असणारा हा कलावंत मधुर व गोड गातो . अतिशय कठीण परिस्थितीतुन या कलाकाराने आपले नाव रोशन केले आहे. वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. त्यांना कीर्ती,व मानसी दोन मुली व अमित नावाचा एक पुत्र आहे . त्यांचा परिवार मुंबई स्थित चांदवली अंधेरीईस्ट येथे सध्या वास्तव्य करीत आहे.
◼️राजेन्द्र केदार यांना जॉनी लिव्हर,अभिनेत्री सई ताम्हणकर,विजय पाटकर, अभिनेता ओमपुरी, अशोक सराफ, भाऊ कदम, आर्यन बब्बर, सागर देशमुख, रवी किशन या दिग्गज कलाकारां सोबत काम करण्याची संधी मिळाली हे विशेष!आता नव्यानेच त्यांचे मराठी चित्रपट पाऊल पडते पुढे व शंशाक हा हिंदी चित्रपट काही दिवसांतच रिलीज होत आहे.
◼️लॉकडाऊनच्या कालावधीत याच कलाकाराने अनेक गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे .त्यांना नुसततीच कलेचीच आवड नाही तर समाज सेवा करायची देखिल मनापासून आवड आहे.राजेन्द्र केदार हे आदिवासी( फासे पारधी) समाजातील (शालेय ) मुलांना कपडे, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य लवकरच वाटप करणार आहे. पुण्यातील सुनील ज्ञानदेव भोसले यांनी कलावंत राजेंद्र केदार यांची नुकतीच मुलाखत घेतली. त्या वेळी ते मनमोकळेपणे बोलत होते.

