▪️बिरसा क्रांती दलचे आयोजन!
▪️चंद्रपूर -◼️किरण घाटे◼️
चंद्रपूर जिल्हा बिरसा क्रांती दल यांचे वतीने उद्या दि.१०जूलैला सकाळी ११वाजता स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी हे विभुषित करणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर सिटीपीएसचे उपमुख्य अभियंता राजेश राजेश राजगडकर यांचे हस्ते होणार आहे.आयोजित कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (ए.आ.वि.प्र चंद्रपूर)रोहन घुगे,विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे , सहायक नियोजन अधिकारी सुभाष कुमरे ,रामनगरचे पोलिस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.तर या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य लेखा तथा चंद्रपूर जि.प.वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम , प्रा.डॉ.श्रीकांत मसराम , प्रा.डॉ.निलेश मंगाम ,व प्रा.डा.भूषण नैताम उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

