इस्लाम धर्मातील प्रत्येक मानवासाठी आपला दैनंदिन खर्च भागवून राहिलेल्या पैशातून आयुष्यात एकदा "पवित्र- हाज " करणे अनिवार्य आहेत. ऊर्दू महिन्याचा शेवटचा १२ वा महिना "जिल-हिजजा'ता. ८ ,९ ,१० ,११ ,१२, असतात, हाजी. लोकं ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये पुरुष अडीच ते तीन मीटर लांब कपडा आपल्या सर्व अंगात गुंडाळून व स्त्रिया पांढरा शुभ्र ड्रेस, कपडा परीधान करून येतात त्यांस '' ऐहराम" असे संबोधले जाते, ऐहेराम पांघरून आल्लाहा मी हजर आहे ।, आल्लाहा मी हजर आहे ।।, आल्लाहा मी हजर आहे ।।
अशा मंजुळ स्वरांचा निनाद आवाज दुमदुमत रात्रंदिवस मक्केमध्ये हाजमय वातावरणात मीना नावाच्या दक्षिण पुर्वेला सात किलोमीटरवर असलेल्या" आराफात" पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात,९ (नऊ) जिलहिज हे "हाज" चा प्रमुख दिवस.
तर सर्व हाजी सकाळी बाराच्या सुमारास पवित्र आराफात मैदानात पोचून "मस्जिद ऐ नमराह' मधे जोहरची (दुपारची) नमाज पठण करतात,आपल्या पापांची क्षमा,करुणा,मागतात, मुला-बाळांसंबंधी, नातेवाईकासंबंधी आपल्या देशासंबंधी त्याठिकाणी सर्वांसाठी दुआ मागतात, (त्याठिकाणी जगातील विविध देशातून, जगामध्ये जवळपास ३५६४ बोलीभाषा बोलल्या जातात) आलेले हाजी एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून कोणीही उच्य नाही, गरीब नाही ,कोणी काळा व गोरा नाहीत,परमेश्वराची सर्व लेकरे सारखीच ५० - ६० लाख लोकं एकाच रांगेत अल्लाच्या खुल्या अकाशाखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच भाषेच्या कुरआन मजीद मधे सांगितलेल्या नियमानुसार पालन करतात. रडून-रडून, व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ,आपल्या हाताने कळत - न कळत केलेल्या चुका - पापांची क्षमा (माफी) मागतात.आल्लाहा जवळ पाप मुक्तीची प्रार्थना करतात.
"३ मार्च ६३२ " याच दिवशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी " मानवी कल्याणासाठी जगाच्या इतिहासात Historical Farewell Pilgrimage Speech "व हजजतुल - विदाह चा खुतबा,केलेले भाषण प्रबोधन" म्हणून प्रसिद्ध आहेत. 'आराफात" या मैदानात लाखोंच्या संख्येने दाखल होऊन प्रेषित सल्ल. यांनी एका उंचीवर असलेल्या टेकडीवर चढून लाखोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसमोर "खूतबा (प्रबोधनात्मक भाषण) दिले.
सर्व स्तुतीसुमने ही फक्त अल्लाहासाठीच आहे, व मी असे घोषित करतो की आल्लाहा हा केवळ एकच आहेत व प्रेषित मुहम्मद स्व.शेवटचे प्रेषित (नबी व रसुल) आहेत, तुम्ही सर्व आदमची संतान आहात. तुमचा रब हा एकच आल्लाह आहेत, आदम हे मातीने बनवलेले होते, तुम्ही देखील मातीनेच बनविले गेले असल्याने तुम्ही सर्व आपापसात एकमेकांचे भाऊ - बंधु आहात, तुम्ही सर्व मातीतूनच जन्मलेले आहेत,मानवता हाच सर्वाधिक मोठा धर्म आहे, मानवामध्ये जात-पात- रंग- नसल-काळे-गोरे- वर्णदोषाला काहीही स्थान नहीं, शेवटी सर्व मानवजात ही एकाच आल्लाहाची लेकरे आहेत,त्यामुळे संयम बाळगा,तुम्ही परस्परांचे गळे कापुन श्रद्धाहिन होवू नका,
कोणत्याही कळ्यांचा - गोऱ्यांवर अधिकार नाही व कोणत्याही गोर्यांचा काळ्यावर अधिकार नाही असे म्हणत तुम्ही सर्व एकच आहेत, हे लोकांनो जो अपराध करील त्याच्याखेरीज अन्य कोणावर त्या अपराधाची जबाबदारी येत नसते व त्यांनी केलेल्या अपराधाची त्याचा मुलगा जबाबदार असत नाही व मुलाने केलेल्या अपराधासाठी त्याचा पिता जबाबदार असे नाही,
त्यामुळे वैर - खून खराबा पासून सावध राहा, दूर राहा , तुम्ही परस्परांचे गळे कापून श्रद्धाहीन होऊ नका, कायम अल्लाहाचे भय बाळगा.आल्लाहा सगळे काही बघत आहे,तुम्ही कष्टाने काम करून खाणारे अल्लाहाला जास्त प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही जे काही हाराम काम करता आहेत उदा. सट्टा खेळणे, खेळविणे,व्याज देणे -घेणे, दारु बनविणे, विकणे - पिणे, चोरी - लूट करणे- करविणे,कोणतेही नशा करणे इत्यादी कामे - सवयी हाराम हराम आहेत या कामापासून अलिप्त - दुर रहा, सावध रहा, कष्ट करणारे आल्लाहाजवळ जास्त प्रिय आहेत. जर तुम्ही एखाद्यास ऊधार मदत केली असेलतर त्याच्याकडून व्याज व जास्तीचे पैसे घेऊ नका, त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा.जर तुम्ही कर्जदाराजवळ एवढे पैसे नसतील तर तुम्ही त्याला माफ करा , संपूर्ण पैसे माफ करा.अशा करण्यामुळे आल्लाहच्या कृपाप्राप्त व्हाल.
वारसांना वारसाहक्क लवकरात लवकर द्या.महिला या अल्लाहाच्या"अमानती " आहेत त्याबद्दल अल्लाहचे भय बाळगा, त्यांना त्रास देऊ नका ,त्यांचा योग्य सांभाळ करा ,त्यांचे जे काही हक्क असतील ते सर्व हकक लवकर देऊन टाका. त्यांच्या विरासतीतील हिस्सा जो असेल तर लवकर देऊन टाका .ते विरासतीमधील हिस्सेदार आहेत .त्यांच्या बरोबर योग्य न्याय करा ,इंसाफ करा. त्यांना तुम्ही अल्लाच्या जामीनावर स्विकारलेली आहेत.
तर तुमचे तुमच्या पत्नीवर अधिकार आहेत आणि तसेच तुमच्याप्रमाणे तुमच्या पत्नीचे देखील तुमच्यावर अधिकार आहेत तर त्यांचे अधिकार द्या. त्यांना योग्य प्रकारे वागवा ,त्यांचा संभाळ योग्य प्रकारे करा. त्यांची तमा बाळगा. आल्लाहा सर्व काही बघत आहेत.
कयामतच्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, तर तुम्ही त्या दिवसाची आठवण ठेवा,हे लोकांनोंं, माझे म्हणणे.,(खुतबा), काळजीपूर्वक ऐकावे ,कारण या वर्षांनंतर मी तुमच्यात असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही.तुमचे प्राण वित्त,अंतिम निर्णय हा कयामतच्या दिवसापर्यंत पवित्र व अतुलनीय आहेत. लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला आल्लाहासमोर हजर व्हायचे आहेत, तोच तुमच्या सार्या स्वर्गीय व नरकाच्या हिशोब बांधणार आहेत. लोकांनों ,मी माझे जीवन कार्य पूर्ण केलेले आहेत मी माझ्या आल्लाहाचा कुरआन मजिद व त्यांच्या प्रेषितांचे सुन्नत (हादीस) तुम्हांसाठी सोडून जात आहेत.तर त्यास श्रद्धेने व आपल्या जीवनामधे त्यांच्यावर अंमल करा,अंमलात आणा. तुम्ही सरळ मार्ग कधीही सोडू नका. तुम्ही आल्लाहच्या मार्गावर चला. व सर्व जगात हा संदेश पाठवा. प्रेषित मुहम्मद स्व.यांचा सर्व जगासाठी कल्याणकारी संदेश ऐकून लाखोंच्या संख्येने त्यांचे मित्रगण (सहाबा , रजि.) ढसाढसा रडू लागले व तेथूनच आपल्या लाडक्या प्रेषितांचे लोक कल्याणकारी संदेश, शिकवण घेऊन जगाच्या काना - कोपऱ्यात ज्यांना जेथे जेथे मार्ग भेटले तेथे तेथे अनुयायी (सहाबा) त्यांनाही मानणाऱ्या संत,वलीं,पीर , साथी,मौलवींनी ,प्रचारकांनी प्रेषीतांचा लोककल्याणकारी संदेश मार्गदर्शन शांतीपूर्ण पध्दतीने प्रसारित,अमंलबजावणी आजही अखंडपणे चालू आहेत आणि कयामत पर्यंत चालुच राहणारही आहे.
लेखक - डॉ : सलीम सिकंदर शेख.
बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर
९२७१६४००१४

