shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमरनाथमधील ढगफुटीत 16 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू..!

अहमदनगर । प्रतिनिधी  :-
 जम्मू काश्मीरमधील भारतीय लोकांचे श्रद्धास्थान अमरनाथ  येथे शुक्रवारी झालेल्या अचानक ढगफुटीत 16 भाविकांचा मृत्यू झाला. तर ३५ जखमींना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 40 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यातआली.घटनास्थळी आयटीबीपीचे आणि एनडीआरएफची पथके युद्ध पातळीवर काम करीत होते. रात्रभर तेथे बचाव कार्य सुरु होते. शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरु झाले होते.

ढगफुटी झाल्यानंतर जो  जलप्रलय झाला त्यामुळे येथे असलेले तंबू,वहाणे व इतर साहित्य वाहून गेले. यामध्ये 15 भाविकांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा अधिक जण अद्यापही बेपत्ता आहेत.त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.

आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे अद्यापही पाऊस पडत आहे. सध्या अमरनाथ यात्रा तातडीने स्थगित करण्यात आली आहे. जे भाविक त्या भागात नाहीत त्यांना देखील तेथे जाण्यापासून रोखले आहे. अमरनाथ गुफा जेथे आहे त्याच्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये जे लोक जखमी झाले आहेत त्यांना एअरलिफ्ट केले जात आहे. सोनमर्ग येथील बेस कॅंम्पवरुन लोकांना परत पाठविले जात आहे. वातावरण खराब असल्याने ढगफुटीसारखी घटना पुन्हा होऊ शकते त्यामुळे अनेक भाविकांना परत पाठविण्यात आल्याचे एका भाविकाने सांगितले.

लष्कराचे हेलिकॅप्टर आणले असून तेथे जखमी भाविकांना एअरलिफ्ट करुन उपचारांसाठी पाठविले जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या ढगफुटीमुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 पेक्षा अधिक जण अद्यापही बेपत्ता आहेत.आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथके युध्द पातळीवर बचाव आणि मदत करीत असताना आढळले.
close