महाराष्ट्र राज्याच्या राजकिय पटलावरील अढळ सितारा म्हणजेच अजित पवार.
इंदापूर प्रतिनिधी: २२ जुलै १९५९ रोजी अजित पवार यांचा जन्म देवळाली प्रवरा (ता.राहुरी जि.अहमदनगर) या त्यांच्या गावी झाला, महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्यांनी मुंबई गाठली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरूवात केली.
अजित पवार यांना ’’दादा’’ अशी ओळख आहे. सर्वजण त्यांना याच नावाने ओळखतात. नावाप्रमाणेच राजकीय क्षेत्रात दादागिरी असलेल आधारवड व्यक्तिमत्व बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीला साजेस कर्तृत्व आणि त्याच कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र राज्याच्या महत्वाची पद योग्य रीतीने सांभाळी .मग उर्जा मंत्री असो अर्थ मंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री आसो प्रत्येकाला सोबतीन घेवुन जाणारा लोकनेता .....अजितदादा पवार
माझा एक अनुभव आपल्या पुढे मांडतो.
साधारणपणे २०११ चा काळ होता. त्यावेळी मी राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करायचो त्याच वेळी एका शालेय ॲडमिशन च्या संदर्भात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी निवासस्थानी गेलो. त्यावेळी दादांच्या बद्दल फक्त एवढच एैकुन होतो. दादांचा स्वभाव खुप रागिट आहे. पण जेव्हा समोर भेटलो. मी माझ काम सांगितल त्या विद्यार्थाची माहीती दिली. त्यावेळी दादांनी पीए ला बोलावुन घेतल मी दिलेली माहिती गाव तलाठी यांच्याकडून तपासुन घेतली आणि दिलेली माहिती खरी निघाली. तेव्हा दादांनी त्या विद्यार्थ्याच शालेय ॲडमिशनच नव्हे तर पुणे येथील बारामती हॉस्टेल वर मोफत राहण्याची सोय सुध्दा केली आणि आमच्या चहा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय देवगीरीवर केली व सायंकाळी बारामतीला येणाऱ्या त्यांच्या ताफ्यातील गाडीत घेवुन आले. हा दादांचा अनुभव जवळुन घेतला आणि त्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस करीता काम करू लागलो................
अश्या कर्तृत्ववान लोकनायक लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शब्दलेखन - राजेंद्र प्रभाकर अर्जुन (चिखली ता.इंदापुर )

