shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भा.ज.पा.ची देशातील १.३० लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची जय्यत तयारी


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

नवी दिल्ली: दि. २२/ देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींची प्रतीक्षा आज संपली आहे. एन.डी.ए.च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होती. तरी द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. त्यामुळे भा.ज.पा.ने देशातील १.३० लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची जय्यत तयारी केली आहे.

मुर्मू यांच्या विजयाचा आत्मविश्वास असल्याने भा.ज.पा. निकालानंतर दिल्लीत विजयी मिरवणूक काढणार आहे. 
राष्ट्रपतींच्या विजयानंतर मिरवणूक काढण्याची पहिलीच वेळ असेल. भा.ज.पा. अध्यक्ष जेपी नड्डा राजपथपर्यंत मिरवणुकीचे नेतृत्व करतील. 
तेथे भाषण देखील करणार आहेत. पहिल्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले जाण्याची शक्यता आहे.

मात्र, मुर्मू या मिरवणुकीत सहभागी होणार नाहीत. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची निवडणुक जिंकून  देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या.

यापूर्वी आजपासून १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २१ जुलै रोजी देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रतिभा देवीसिंह पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.
close