shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची बल्हारपूर तालुक्याला भेट..!

▪️शेतातील नुकसानग्रस्त पीकांची केली पाहणी▪️एसडीओ डॉ.दिप्ती सुर्यवंशी- पाटील व तहसीलदार संजय राईंचवार यांची उपस्थिती !                      

चंद्रपूर▪️किरण घाटे▪️






काल गुरुवार दि. 21जूलै रोजी सायंकाळी 5:00 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे  यांनी बल्लारपुर तालुक्यातील मौजा दुधोली, बामणी, येथे  मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे  शेतपीकांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीता भेट दिली. या वेळी त्यांचे सोबत  बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दीप्ती सुर्यवंशी - पाटील, तहसिलदार  संजय राईंचवार, न.प बल्लारपूरचे मुख्याधिकारी विजय देवळीकर, तालुका कृषी अधिकारी  श्रीधर चव्हाण,  बामणीचे सरपंच सुभाष ताजणे दूधोली येथील शेतकरी तसेच मंडळ अधिकारी  शंकर खोब्रागडे ,तलाठी शंकर खरूले , कृषी सेवक राहुल अहिरराव ,अभियंता सेंट्रल वॉटर कमिशन वतन दुबे , वाढई (अभियंता राष्ट्रीय महामार्ग)  वैभव जोशी (शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) यांची प्रामुख्याने  उपस्थिती होती. भेटी दरम्यान जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी वर्धा नदीच्या पुलाची पाहणी केली. तसेच नगर परिषद क्षेत्रातील गणपती वॉर्ड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर जिल्हाधिकारी यांनी  तालुक्याच्या सर्व प्रमुख अधिकारी यांची उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन पुरामुळे झालेल्या शेत पीकांच्या व घराच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

close