▪️शेकडों हेक्टर पीकांचे नुकसान -शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण!
नेरी( चिमूर)▪️किरण घाटे▪️
चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात असलेल्या नेरी मंडळात काल गुरुवार दि. 21 जुलै पासून पीक नुकसान पाहणीला सुरुवात झाली आहे. चिखली व ओवाळा येथील धान, सोयाबीन तथा कापूस पीकांची पाहणी झाली असता नदी व नाल्या शेजारील शेतीचे व पीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला तर तलाव -बोड्या तुडुंब भरल्या .दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका नेरी महसूल मंडळात बसला आहे .पावसाचा जोर ओसरल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणाला आता सुरुवात झाली आहे चिमूर तालुक्यात मागील आठवड्यापासून रोवणीच्या कामाला वेग आलेला आहे. दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते .
शेतातील बाधांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील रोहिणी झालेले धान प-हे सुद्धा वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आलेली आहे . नुकसानीचे सर्वेक्षण नेरीचे मंडळ अधिकारी कुंभरे यांचे सोबत महसूल विभागाचे पटवारी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून झालेल्या पीकांचे सर्वेक्षण करीत आहे शासनानी बाधित कुटुंबांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या परिसरात होत आहे. चिमूर तालुक्यात पुरामुळे नदी नाल्याजवळील जमिनी अधिक प्रभावित झाल्या आहेत .महसूल विभाग शेत बांधावर पोहचून शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करीत आहे .
दि.18 जुलै 2022 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते. पाऊस मुसळधार झाल्याने शेतकऱ्यांच्या नदी नाल्या शैजारी शेतजमिनी जलमय झाल्या .यात नेरी व या परिसरातील शेत शिवारातील जमीन अधिक प्रमाणात प्रभावी झालेल्या आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. जमिनीवरील कपाशी ,सोयाबीन ,तूर तसेच धानाची रोवणी व धानाचे परे पूर्णपणे पाण्यामुळे बाधित झालेले आहे शेतकरी सध्या परिस्थिती पूर्णता चिंताग्रस्त झालेला असल्याचे दिसून येते.




