shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन पूर्ण..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 
शहरातील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात
 १३ व १४जुलै  रोजी  महाविद्यालयाचे मूल्यांकन पूर्ण झाले नॅक कमिटीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक , संशोधन याविषयी केलेल्या कामाचा अहवाल, प्रत्यक्ष पाहणीतून समाधान व्यक्त केले. लवकरच तपासणी अहवाल कळविण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या पाहणीनंतर 
महाविद्यालयाच्या सर्व टीम चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मूल्यांकनातील विशेष बाबी व सूचना यावेळी त्यांनी दिल्या.


नॅक कमिटी सदस्य प्राचार्य रचना दुबे वाराणसी, चेअरमन देवाशिष भट्टाचार्य आसाम ,सदस्य डॉ. नागाज्योती कोरीपेला तेलंगणा यांचा कमिटी मध्ये  समावेश होता. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव फावडे,महाविद्यालयीन नॅक  समन्वयक प्रोफेसर डॉ . नवनाथ काशीद व समन्वयक सदस्य प्रा डॉ संभाजी भंडे आदींनी मूल्यांकनात पुढाकार घेऊन सादरीकरण केले.मूल्यांकन प्रक्रियेत सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
close