▪️ अनेकांनी केले ममताचे कौतुक
गडचांदूर (चंद्रपूर)▪️-किरण घाटे -▪️फॅशनच्या झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादुमयी सृष्टी असते, पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारा मागे व झगमगाटामागे असते अमाप मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्या कल्पनांना वास्तवात आणण्याची कसब!
▪️आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली अनेक वर्षे फॅशन डिझायनरचे काम करणार्या छोटयाशा गडचांदूर शहरातील ममता सत्यनारायण शर्मा हिने डिझायनींग केलेल्या ड्रेसची नागपूर IIDS काॅलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील फॅशन रणवेय 2022चा कार्यक्रम नुकताच नागपूर येथे चिनविस सेंटर मध्ये आयोजीत केला होता.त्यावेळी प्रामुख्याने दिग्दर्शक श्रीमंत झोया अफरोझ(Miss India International), राजनकुमार (celebrity fashion designer), व अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत ममताने प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी केलेल्या डिझायनींगची भुरळ प्रेक्षकांना व निरीक्षकांना भावली. ममता शर्मा यांनी डिझायन केलेल्या ड्रेसची चक्क लंडन फॅशन विक साठी निरीक्षकांनी निवड केली.
यामध्ये IIDS नागपूर या कॉलेजनी व त्या कॉलेजचे संचालक प्रशांत पंचलवार यांनी ममताला लंडन फॅशन विक 2022 साठी लंडनमध्ये इंटरशीप साठी संधी दिली आहे.या संधी मुळे तिला लंडनमध्ये निःशुल्क प्रशिक्षण व इंटरशीप मिळेल.
शर्मा यांनी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा कामी आली असून तिचे फॅशन डिझायनरचे सर्वञ कौतूक होत आहे. शिवाय छोट्याश्या गडचांदूर शहराचे नांवही रोशन झाले आहे.


