◻️▪️चंद्रपूर किरण घाटे जि.प्र.
▪️गेल्या चार पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू असुन अनेक खोलगट भागात पाणी शिरले तर काही घरांची पडझड झाली असल्याचे वृत्त आहे.दरम्यान चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी काल बुधवार दि.१३जूलैला पठाणपूरा व रहमत नगर येथे भेटी देवून तेथील परिस्थिती जाणून घेतली .या वेळी त्यांचे सोबत चंद्रपूर सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे , तहसीलदार निलेश गौड , चांदा रैयतवारीचे तलाठी प्रविण वरभे महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
▪️राजूरा येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसीलदार हरीश गाडे यांनी तालुक्यातील काही गावांना भेटी देवून पूर परिस्थिती जाणून घेतली.दरम्यान दोन दिवसांपूर्वी वरो-याच्या तहसीलदार रोशन मकवाने यांनी कृषी अधिका-यांसोबत तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत नुकसानीची पाहणी केली व आढावा जाणून घेतला या वेळेस नायब तहसीलदार काळे व मंडळ अधिकारी महादेव कन्नाके,तसेच कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यातील अनेक गावांतील पटवारी नुकसानीचे पंचनामे करीत असल्याचे आज दिसून आले.
![]() |
| एसडीओ राजूरा |
![]() |
| तहसीलदार वरोरा |

.jpeg)




