shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर सह.बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार - सर्व १२ जागी एकतर्फी विजय

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर सह.बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार
       - सर्व १२ जागी एकतर्फी विजय
फोटो:-भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा येथे रविवारी वालचंदनगर सहकारी बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
इंदापूर: प्रतिनिधी 
     भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर सहकारी बँक लि.वालचंदनगर च्या सन २०२२-२७ करिता निवडून आलेल्या सर्व १२ नूतन संचालकांचा सत्कार बावडा येथे रत्नाई निवासस्थानी रविवारी (दि.१०) करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नूतन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
      वालचंदनगर सहकारी बँक लि. वालचंदनगर या नावाजलेल्या बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी ( दि.९) झालेल्या निवडणुकीत  स्वाभिमानी सहकारी पॅनलचे संतोष हनुमंत गायकवाड, विठ्ठल नामदेव चव्हाण, शरद अर्जुन चव्हाण, संदीप परशुराम फाळके, संजय नारायण भरते, शशांक मधुकर माडगे, राजेंद्र सूर्यजी रणमोडे, विजय शिवाजी अर्जुन, विजय सोपान म्हस्के, जीवन लक्ष्मण भोरे, सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी व सौ.पार्वती गोविंद बनसोडे हे सर्व १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या विजयी नूतन संचालकांचा  फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळास पारदर्शक कामकाज करा, कर्मचारी वर्गाचे हित जपा असा सल्ला देत बँकेत सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही संचालक मंडळाशी संवाद साधताना दिली. याप्रसंगी इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सत्यशील पाटील, वालचंदनगर ग्रा. पं.चे सरपंच कुमार गायकवाड, विश्वजित तावरे, उपसरपंच संजय नकाते, संतोष कदम, राहुल बावडेकर, अनिल शहा, सचिन चव्हाण, माजी उपसरपंच दयानंद झेंडे, सचिन अचलारे, निलेश गुळवे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
____________________________

close