पृथ्वीचे वाढते तापमान ही समस्त मानवजातीला धोक्याची घंटा त्यामुळे यावर वृक्षारोपण व त्याच्या संवर्धन हा एकमेव पर्याय - आचार्य ऋषिकेश शिंदे.
फोटो : हनुमान मंदिर परीसरात वृक्षारोपण करताना ऋषिकेश शिंदे ,प्रवीण काळे ,रोहित काळे ,अजित शिंदे सह इतर
इंदापूर - प्रतिनिधी :
दि. १० पर्यावरणाचा होणारा रास व ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. पृथ्वीचे वाढते तापमान ही समस्त मानवजातीला धोक्याची घंटा आहे त्यामुळे यावर वृक्षारोपण व त्याच्या संवर्धन हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे . केवळ फोटो पुरते वृक्षारोपण करू नका आपली जबाबदारी म्हणून वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा असे आवाहन आचार्य ऋषिकेश शिंदे यांनी केले .
शिंदेवस्ती ,पळसदेव येथील हनुमान मंदिर परिसरात आषाढी एकादशी च्या निमित्ताने पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी शिंदे बोलत होते .या वेळी हनुमान मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पिंपळ, वड ,कडुलिंब ,
करंज ,जांभूळ , कदंब यासारख्या वृक्षाचे रोपण या वेळी करण्यात आले. या वेळी आचार्य ऋषिकेश शिंदे ,माजी उपसरपंच प्रवीण काळे ,अजित शिंदे , रोहित काळे , होमगार्ड सतीश बनसुडे , छगन बनसुडे , सनील शिंदे , पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार ,अतुल काळे ,सागर बनसुडे ,अक्षय बनसुडे , हर्षद बनसुडे ,बिपीन बनसुडे सह युवक मोठ्या संख्येने उपस्तित होते .
_______________________

