shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भगवत गीता वाटप

पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भगवत गीता वाटप.

फोटो : भगवत गीतेचे वाटप करताना माजी  सभापती प्रवीण माने , बिपिन घाडगे दिपक अनपट.

इंदापूर - प्रतिनिधी :
दि.  ११ पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हिंदू धर्मातील पवित्र धर्मग्रंथ भगवत गीता चे मोफत वाटप करण्यात आले.  विठ्ठलवाडी रुई  येथे  ३० जून ते ७ जुलै या दरम्यान युवक नेतृत्त्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या समारोप प्रसंगी  माजी आरोग्य सभापती प्रवीण माने, आर्ट ऑफ लीव्हिंगचे प्रशिक्षक  बिपिन घाडगे व दीपक अनपट यांच्या हस्ते युवक नेतृत्व शिबिराच्या प्रशिक्षणार्थींना  मोफत भगवत गीता चे वाटप करण्यात आले.
         भगवत गीता हा पवित्र धर्मग्रंथ आहे. याला केवळ पुस्तक म्हणून वाचू नका . भगवत गीतेमध्ये  मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य आहे . तर मानवी जीवन यशस्वी करण्याचे सामर्थ्य देखील यामध्ये आहे.म्हणून प्रतेकाच्या घरी भगवत गीता आसने आवश्यक आहे. भगवत गीतेचे वाचन करून त्याचे आचरण केल्यास नवीन संस्कारक्षम पिढी घडेल  असे मत बिपिन घाडगे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. या वेळी  पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत भगवत गीता वाटप करणे या उपक्रमाचे कौतुक केले.                      
         या वेळी  विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट चे अध्यक्ष हरिश्चंद्र माने , माजी बांधकाम सभापती प्रवीण माने , बिपिन घाडगे व दीपक अनपट ,आचार्य  ऋषिकेश शिंदे , चेतन बनसुडे , सागर बनसुडे ,अक्षय बनसुडे , निलेश रंधवे , विलास शेलार , पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार , मेघराज कुचेकर ,पूजा पवार सह प्रशिक्षणार्थी व नागरिक उपस्थित होते.
_________________________

close