shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुठेवाडगावचे तुळशीराम महाराज देवस्थान ठराविक कुटुंबाची मक्तेदारी नाही - चेअरमन डॉ.मुठे


माळवाडगाव (प्रतिनिधी) - संत तुळशीराम महाराज देवस्थान च्या बाबतीत माजी अध्यक्ष यांचा असा आरोप आहे की गावातील ग्रामस्थांची राजकारणासाठी दिशाभूल केली जाते हा आरोप खोटा आहे असे मुठेवडगाव सोसायटीचे चेअरमन डॉ. शंकरराव मुठे यांनी केले.
        तुळशीराम महाराज देवस्थान चा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सर्व जाती-धर्माचे बांधव एकोप्याने व हिरारीने भाग घेऊन उत्साहात साजरा करतात. ५२ वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायणाच्या मिरवणुकी पालखी व पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याची पालखी ओढण्याची सेवा मनोभावे गायकवाड परिवारातील लोक करतात तसेच ५२ वर्षापासून दररोज मंदिरासमोर सकाळ व संध्याकाळ शहाडा वाजवण्याची सेवा भोंडगे परिवार सातत्याने मनोभावे करतात तसेच बाबाच्या मंदिर परिसराची ३० तरुणांची स्वच्छता कमिटी मंदिर परिसर दररोज साफसफाई करण्याचे काम करते. तसेच देवस्थानचे पुजारी लोखंडे अविरतपणे बाबाची आरती व इतर सेवा करतात. गावातील जोशी गुरु हे सर्व धार्मिक पुरोहिताची सेवा करतात. हे सर्वजण कुठलाही मोबदला न घेता मनोभावे सेवा अखंडपणे ५२ वर्षे करत आले आहे.
    वरील सेवा करणाऱ्या मंडळी पैकी एक एक प्रतिनिधी देवस्थान विश्वस्ता मध्ये घ्यावे अशी गावातील तरुणांची व भक्तांची मागणी होती. परंतु यातील कोणालाही घेतले नाही.

    तसेच पहिल्या विश्वस्त मंडळांमध्ये १३ सभासद व १३ विश्वस्त होते पण नंतर देवस्थान सभासद वाढवताना ग्रामसभा घेऊन किंवा दवंडी देऊन गावातील ग्रामस्थांना भक्तांना व तरुणांना विश्वासात घेऊन सभासद वाढवणे व कमी करणे ही प्रक्रिया निपक्षपातीपणे करावयास हवी होती पण माजी अध्यक्ष यांनी तसे न करता विरोध करणाऱ्या पहिल्या १३ विश्वस्त मंडळातील भिकचंद मुठे व रमेश मुठे यांना कुठलीही नोटीस व पूर्वकल्पना न देता हेतू पुरस्कार पणे वगळले. गावातील तरुणांना ग्रामस्थांना विश्वासात न घेता माजी अध्यक्ष यांनी स्वतःच्या घरामध्ये बसून स्वतःचा भाऊ,स्वतःचा पुतण्या, यांना तसेच देवस्थानचे माजी उपाध्यक्ष यांनी स्वतःचा भाऊ, यांना व तसेच देवस्थानचे माजी सचिव यांनी स्वतःचा मुलगा व काही सभासद अध्यक्षांच्या कानाखालचे विरोध न करणारे अशा लोकांची सभासद म्हणून परस्पर निवड करून स्वतःचे स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव होण्यासाठी घरातीलच सभासद वाढवले अशा प्रकारे फक्त १९ सभासद करून आपले बहुमत वाढवले व विरोधकाचे कमी केले. त्यामुळे गावातील तरुण ग्रामस्थ तीव्र आक्रमक होऊन विरोध केल्यामुळे त्यांनी पोलीस बंदोबस्त मध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा बंद करून नवीन विश्वस्त मंडळाची निवड केली गावातील तरुण आक्रमक झाले हे पाहून नंतर पोलीस बंदोबस्त आणखीन वाढवून नंतर ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे या विश्वस्त मंडळाला भक्तगणांचा व तरुणांचा विरोध आहे.

     आम्हाला पण देवस्थान मध्ये राजकारण करायचं नाही परंतु एकाच कुटुंबातील सदस्य घेऊन जसे ते जनतेतून निवडून आले अशा अविर्भावात बहुमत आहे असे दाखवायचे आणि आमचं बहुमत आहे असं म्हणायचे यामुळे हे एक प्रकारचे राजकारण आहे असे मुठेवाडगाव सोसायटीचे चेअरमन डॉ. शंकरराव मुठे यांनी म्हटलेआहे.

नवीन विश्वस्त निवड करतांनी ग्रामसभा घेऊन त्यामधून सर्व जाती धर्मातील तरुणांना देवस्थानचे सभासद करून घेऊन त्यातून विश्वस्ताची निवड करायला पाहिजे होती देवस्थान हे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांच्या कुटुंबाची मक्तेदारी नाही हे देवस्थान सर्व तळागाळातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे सर्व समाजातील लोकांना विश्वस्त मंडळात स्थान द्यायला पाहिजे होते.

श्री भिकचंद कमलाकर मुठे 
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वारकरी परिषद अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख
माजी विश्वस्त संत तुळशीराम महाराज देवस्थान.
close