shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांचा सत्कार


शिर्डी । प्रतिनिधी:
आज शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा श्री हरिषचंद्र भोईर यांनी शिर्डी येथे उत्तर अहमदनगर जिल्हा पदाधिकारी यांची भेट घेतली यावेळी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाच्या विविध आंदोलने व महत्वपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले,
          ओबीसी आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलनाची ठिणगी ही शिर्डी येथे पडली,भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब गाडेकर नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष श्री स्वानंद रासने यांच्या अथक प्रयत्नाने ओबीसी आरक्षण आंदोलन यशस्वीरित्या करण्यात आले होते याची दखल महाराष्ट्र राज्य कार्यकारणींनीने घेतली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री भोईर यांनी सांगितले.

         यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा पदाधिकारी वसंतशेठ भोईर,  राजू पाटील , इंद्रपाल भोईर, रामदास पाटील, अविनाश भोईर , बाळाशेट भोईर , भरत मारू , चंदूलाल सावला , नाना मढवी , विनायक पाटील , अनिल पाटील, दिपक माळी आदी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला ,
           यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उत्तर अहमदनगर श्री बाळासाहेब गाडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री सौरभ कोळपकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष राहता श्री स्वानंद भैय्या रासने, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष शिर्डी श्री अँड विक्रांत वाघचौरे  आदी पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
close