नगर । प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सुरेगाव येथे आज दिनांक 23/07/2022रोजी विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत योग व आरोग्य विषयावर डॉ सौ योगिता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांनी शारीरिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य कसे राखावे याबद्दल विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले विद्यालयाचे पालक श्री विलास माधव खैरे यांनी शाळेसाठी LED TV शाळेला भेट स्वरूपात दिली. कार्यक्रमास विद्यालयाचे माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब ढोमसे पाटील उपस्थित होते विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री पाचोरे सर तसेच सर्व शिक्षकवर्ग व विद्यालयाचे पालक आदि मान्यवर उपस्थित होते.

