शिर्डी । प्रतिनिधी :-
आज स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीचे आरक्षण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व ओबीसी आरक्षणाचे कैवारी उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.आ.श्री योगेश अण्णा टिळेकर व जेष्ठ भाजपा नेते आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर, श्री. बाळासाहेब गाडेकर, श्री. स्वानंद रासणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अडीच वर्षे रस्त्यावर उतरून सर्व पदाधिकाऱ्यांच्या संघर्षा केला. त्याचे फलित म्हणून आज मा. सर्वोच्या न्यायालयाने येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी सामाज्याला 27% आरक्षण देऊन तमाम ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षणात अभय दिले आहे.. यामुळे भाजपा ओबीसी आरक्षण जल्लोष साजरा करणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जनसेवा जनसंपर्क कार्यालय येथे ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे *माननीय. नामदार राधाकृष्णाजी विखे पाटील साहेब* याचा भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भा.ज.पा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. योगेशजी आण्णा टिळेकर यांच्या सुचनेनुसार ओबीसी आनंद उत्साह साजरा करताना फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र माळवदे , श्री. अमित बनसोडे, श्री. किरण शहाणे, श्री. अशोक दहीवळकर, श्री. किरणजी अंत्रे, श्री. भगवान बनसोडे, श्री. सुभाष गाडेकर, श्री.नानासाहेब गाडेकर, श्री. भगवान गाडेकर, श्री. राहूल जंगम, श्री. बाळासाहेब दहीवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

