shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मेघालय येथील एन.आय.टी.-एम.एस.सी. रसायनशास्त्र अभ्यासक्रमासाठी कु.ऋतुजा हरिश्चंद्रे हिची निवड..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०२ जुलै २०२२

मेघालय येथील एन.आय.टी.-एम.एस.सी. रसायनशास्त्र अभ्यासक्रमासाठी कु.ऋतुजा हरिश्चंद्रे हिची निवड..!!

राहुरी : राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य विद्यालयाच्या रासायनिक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी कु. ऋतुजा सुधाकर हरिश्चंद्रे हिची मेघालय येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन.आय. टी. येथे एम. एस्सी. रासायनशास्त्र या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

         राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील कु. ऋतुजा हरिश्चंद्रे ही सध्या राहुरी महाविद्यालयात तृतीय वर्षात रसायनशास्त्र वर्गात शिक्षण घेत आहे. तिने पदवीच्या अंतिम वर्षातील शिक्षण सुरू असतानाच प्रवेशासाठी आवश्यक राष्ट्रीय स्तरावरील 'जॉइंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर' २०२२ ही परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत देशातील लाखो विद्यार्थ्यांमधून प्रथम फेरीत एन. आय. टी. मध्ये प्रवेश मिळवला. आपल्याला मिळालेले यश हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पठारे, रासायनिक शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक बाळकृष्ण अंगारकी, तसेच सर्व मार्गदर्शक प्राध्यापक यांच्यामुळे मिळाल्याची कृतण्यातेची भावना ऋतुजा हिने तिच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केली.
       अतिशय हुशार व होतकरू विद्यार्थिनी असलेली ऋतुजा ने मिळवलेल्या या संधीचे ती सोनं करेल असा ठाम विश्वास विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पठारे यांनी तिचे अभिनंदन करताना व्यक्त केला, तर तीच्या एन.आय.टी. मेघालय येथे झालेल्या निवडीबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी, तसेच पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य रसायन शास्त्र विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अभिनंदन केले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close