डॉ .श्री .काळे व डॉ. सौ . काळे यांचा करण्यात आला सन्मान
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
वाडी कुरोली : २ / शुक्रवार दि. १ जुलै २०२२ रोजी वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे " कृषी दिन " व " डॉक्टर दिन " निमित्ताने वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय पालकत्व घेऊन सेवा देणारे डॉ.श्री. कमलकिशोर काळे व डॉ.सौ.प्रियंकाताई कमलकिशोर काळे यांचा सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर प्रशालेचे प्राचार्य मा.श्री.दादासाहेब खरात सर , पर्यवेक्षक श्री. सत्यवान काळे सर , सहशिक्षिका श्रीमती. सुवर्णलता धांडोरे मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी सहकार शिरोमणी वसंंतराव काळे शिक्षक व सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री. दशरथ काळे सर यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना डॉ. काळे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांचे आरोग्य व मानसिक आरोग्य याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. दिलीप लिंगे सर यांनी " डॉक्टर दिनाच्या " शुभेच्छा देताना स्वरचित कविता सादर केली . तर बळीराजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कविता श्री. शिवाजी कौलगे सर यांनी सादर केली.
या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

