एक हॉरर फिल्म करायचे स्वप्न आहे - अभिनेत्री मनिषा अवचिते
प्रतिनिधी : संजय वायकर
अभिनेत्री मनीषा रमेश अवचिते यांनी वेबसिरीज व अलबमध्ये काम केले आहे. मनीषा लहानपनापासून जिद्धी आहे. शाळेत व कॉलेज मध्ये शिकत असताना ती डान्स,नृत्य , नाटक अश्या विविध स्पर्धे मध्ये भाग घेत होती आणि नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची.
शिर्डी एक्सप्रेस टीमशी बोलताना मनिषाने सांगितले की, मला नेहमीच आई -वडिलांची साथ मिळत होती. आई नेहमी मला सांगत असते कि बेटा तुला ज्या क्षेत्रामध्ये काम करायच आहे त्या क्षेत्रामध्ये काम करू शकते . तुला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझे वडील कलाकार असल्यामुळे मला आणखीन च पाठींबा देतात. तसेच आतापर्यन्त कला क्षेत्रामध्ये व मराठी चित्रपटमध्ये नाव रोशन करायच आहे. फॅशन शो मध्ये मी पाच वेळा सहभाग घेतली आहे. तीन वेबसिरीज मध्ये काम केली असून एक अल्बम आत्ता वेबसिरीज मध्ये लीड रोल मध्ये काम करतआहे. हिंदी वेब सिरीज व मराठी चित्रपटासाठी लीड मेन हिरोईन च पात्र आलेलं आहे. अनेक नाटकांमध्ये भाग घेतलेला आहे.
एक हॉरर हिंदी फिल्म करायचे स्वप्न असल्याचे मनिषाने यावेळी शिर्डी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले .

