shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षण क्षेत्रात सेवा करणारांना समाजात सर्वोच्च सन्मान मिळतो -प्रा.ईश्वर मुंडे..!!

 
 
अलिमोद्दिन अन्सारी ,तानाजी ढाकणे व अब्दूल समद शेख यांचा सेवा गौरव संपन्न..!
  
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:- 
शिक्षण क्षेत्र पवित्र व परोपकार करण्याचे माध्यम आहे. शिक्षकांच्या हातून कर्तूत्ववान पिढी घडते त्या मुळे त्यांना विद्यार्थी व पालकांचे आशिर्वाद मिळतात.त्याच प्रमाणे समाजात सर्वोच्च सन्मान मिळतो असे प्रतिपादन स्वेच्छा सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले.

      
जि.प.कें.उ.प्रा.उर्दू शाळा अजीजपुरा,केज येथे आयोजित शिक्षकांच्या सेवा निवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.
     
या वेळी जि.प.उ.प्रा.उर्दु शाळा अजिजपुरा येथील प्राथमिक पदवीधर अलिमोद्दीन अहेमद  हुसैन अन्सारी ,जि.प.उ.प्रा.शा. बनकरंजा येथील मुख्याध्यापक तानाजी चांगदेव ढाकणे,कें.प्रा.शा.केज येथील अब्बदुलसमद बाबामुयॅां शेख  यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
      
या वेळी तिन्ही सत्कार मुर्तींचा सपत्नीक शाल,श्रीफळ,पुष्पहार व पुर्ण पेहराव कपडे देवून सन्मान करण्यात आला.
    
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज चे गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे होते.
 
 
आपल्या भाषणात ते म्हणाले,जिल्हा परिषदेतील शिक्षक अडचणीवर मात करून आपल्या शाळांची गुणवत्ता वाढवत आहेत ही कौतूकाची बाब आहे.
    
या प्रसंगी जेष्ट शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे म्हणाले,तान तनाव रहित राहून अध्यापन केले तर शिक्षकांना समाधान मिळून  आयुष्यमान वाढते.
    
कार्यक्रमास वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुजफरोद्दिन ईमानदार,केज केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एम.डी.घुले,विद्यमान केंद्रप्रमुख बालासाहेब  चाटे,केंद्रीय मुख्याध्यापक भारत  काळकुटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबर शेख दै.वास्तव चे उपसंपादक श्रीराम तांदळे,रिपोर्टर चे माजेद शेख,एकबाल शेख,रियाज फारूकी यांच्या सह मान्यवर उपस्थीत होते.
     
याच कार्यक्रमात नाशिक पोलीस ॲकॅडमी येथे नुकतेच फौजदार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वरूपा सुंदरराव नाईकवाडे,अशोक मधुकर मैंद व कृष्णा कावळे यांचा सन्मान करण्यात आला.
   
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख बालासाहेब चाटे यांनी केले.सुत्र संचालन फारूख कामठाने यांनी तर आभार अंगद राख यांनी व्यक्त केले.
     
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.उर्दु प्रा.शाळेचे मुख्याध्यापक हाजेदअली सय्यद,मुब्बशीर ईमानदार,समद मुल्ला,महादेव केदार,जफर शेख सर यांनी परिश्रम घेतले.
    
कार्यक्रमा केज केंद्रातील सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका व पालक उपस्थीत होते.
close