shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा पुरवठा अधिकारी आणि शेवगाव पुरवठा विभागातील कर्मचारी यांची प्रा किसन चव्हाण यांनी घेतली झाडाझडती

शेवगाव (प्रतिनिधी):- शेवगाव तालुक्यातील रेशन धारकांना त्वरित अन्नधान्य पुरवठा करावा. 
 या बाबत शुक्रवार दि १५/७/२०२२ रोजी अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी मॅडम या  शेवगांव तहसील कार्यालयात आल्याचे समजताच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण हे वंचित च्या पदाधिकाऱ्यासह कार्यालयात पोहचले आणि गेल्या पाच महिन्यापासून शेवगाव तालुक्यातील जनतेला रेशन का मिळत नाही ?याला जबाबदार कोण? प्रशासकीय यंत्रणा की स्वस्त दुकानदार ? तुमच्यात मेळ नाही आणि उपासमार होतेय भरडलाय जातोय गोरगरीब ,याला जबाबदार कोण आज याचा छडा लावल्याशिवाय आम्ही बैठकीतून बाहेर जाणार आहे असा आक्रमक पवित्रा घेत प्रा किसन चव्हाण यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ,शेवगाव पुरवठा कार्यालयातील कर्मचारी आणि शेवगाव तालुक्यातील सर्व स्वस्त दुकानदार याना फैलावर घेत सर्वांचीच झाडाझडती घेतली.

      यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष राजुभाऊ नाईक,लक्ष्मण मोरे,सलीम जीलानी व इतर पदाधिकारी उपस्थित होते दि २८ जून 2022 रोजी मा जिल्हाअधिकारी संदिप निचित यांना प्रत्यक्ष भेटून वंचित बहूजन आघाडी च्या वतीने  लेखी निवेदन देण्यात आले होते,निवेदनामध्ये 1) जानेवारी ते एप्रिल महीन्याचे अंत्योदय, प्रधानमंत्री योजनेतील गहू,तांदुळ, आद्यापही प्राप्त झालेले नाही २)जूलै महीन्याचा एक आठवडा पुर्ण होत आहे तरीही उर्वरित में महीन्याचे संपुर्ण मासिक धान्य, प्रधानमंत्री अन्न योजनेतील धान्य आद्यापही प्राप्त झालेले नाही,३) तसेच जून महीन्यातील नियमित धान्य आद्यापही प्राप्त झालेले नाही ४) मार्च व एप्रिल महीन्याचे धान्य दुकानात पडून आहे ते धान्य पॉश मशिन मध्ये आजही दाखवत नसल्याकारणाने ते धान्य दुकानदार वाटप शकले नाही,ते अन्न धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी ५) मशिनला अन्न धान्य असल्यास दुकानात त्वरित येत नाही,दुकानात आले तर ते वाटता येत नाही कारण ते मशिनला दाखवत नाही १) शेवगांव शहर व तालुक्यातील अनेक गोरगरीब कुंटुबांना कुपन असून अन्न धान्य मिळत नाही या सर्व बाबी बाबत शंका निर्माण होत आहे दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण सामोरे जावे लागत आहे तसेच दुकानदार संदर्भात अनेक गैरसमज निर्माण होतात या सर्व विषयी त्वरित निर्णय घेण्यात यावे शेवगाव शहर व तालुक्यामधील शिधा पत्रिका धारकांना जानेवारी २०२२ पासून स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे मोफत धान्य अद्याप मिळालेले नाही. अंत्योदय योजनेतील गव्हाचा पुरवठा शेवगाव शहर व तालुक्यातील ५० स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध झालेला नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अंत्योदय योजनेतील गव्हाचा पुरवठा १२४ दुकानदारांना प्राप्त झालेला नाही. मार्च महिन्यातील तांदूळ पुरवठा ९५ स्वस्त धान्य दुकादारांना प्राप्त झालेला नाही. मार्च महिन्यातील विकतचा अंत्योदय योजनेतील विकतचे अन्नधान्य ८१ स्वस्त धान्य दुकानदारांना मिळालेले नाही. तसेच एप्रिल महिन्यातील अत्योदय योजनेतील गहू व तांदळाचा पुरवठा १२० दुकानदारांना प्राप्त झालेला नाही. 

 दुकानात माल असून सुद्धा वाटप करता येत नाही. असा मालाचा मशीनचा डाटा बदल ४ ते ५ महिन्यापासून मागे पुढे होत आहे. मग हे अन्नधान्य तो दुकानदार कसा वाटणार ? 

शेवगाव पुरवठा विभागाची ऑनलाईन नोंदणी, नावे घालने व नावे कमी करणे, रेशनकार्ड ऑनलाईन करणे गेल्या ६ महिन्यांपासून बंदच आहे. तसेच जुन्या, दुबार शिधा पत्रिका बदलून नवीन शिधा पत्रिका वेळेवर मिळत नाहीत. शेवगाव पुरवठा विभागामध्ये गेल्या ५ महिन्यांपासून शिधा पत्रिका उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते. तक्रारदारांना दुकानदारांचे नाव सांगितले जाते. अशा पद्धतीने शेवगाव तालुक्याच्या पुरवठा विभागाचा गलथान कारभार  सुरू आहे. अनेक रेशनकार्ड धारकांकडे ऑनलाईन नोंदणी केलेला. बारा अंकी नंबर असून देखील अन्नधान्य मिळत नाही.

यासर्व कारणांमुळे गोर गरीब जनता अन्नधान्या पासून वंचित राहते. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येते. अन्नधान्य घेण्याकरिता गोर गरीब कुटुंबांना रेशन दुकानासमोर रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते. रांगेत उभे राहून देखील अनेकदा अन्नधान्य मिळत नाही. अशा पुरवठा विभागाच्या असंख्य तक्रारी आहेत. या तक्रारींचे निवारण करून गोर गरीब जनतेला न्याय द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा कार्यालयात येऊन  तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशाराही प्रा चव्हाण यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिला याबैठकी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, तहसीलदार छगनराव वाघ,सहायक जिल्हापुरवठा अधिकारी महेंद्र कदम,नायब तहसिलदार बेरड साहेब यासह शेवगाव पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आगडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
close