कोपरगाव । प्रतिनिधी :-
सुरेगाव येथील आरोग्य सेविकेचे पंतप्रधानांकडून अभिनंदन सुरेगाव आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती तरूळे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना सन्मानपत्र पत्र पाठवण्यात आले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, तुमच्या सहभागाने भारताने कोविड-19 विरुद्धच्या आमच्या लढ्यात ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्याने सिद्ध केले की तुमचा भारत आज तळागाळ्यातील माणसापर्यंत टोकाला पोहोचला आहे.
तुमच्यासारख्या लोकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे आहे. तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आणि या मोहिमेत तुमची भूमिका बजावल्याबद्दल मी तुमचे कौतुक करू इच्छितो. येणार्या पिढ्यांना भारताच्या या कर्तृत्वाचा त्या काळात अभिमान वाटेल.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. असेे भावनीक पत्र देऊन पंतप्रधान मोदीनी या श्रीमती तरूळे यांच्या कार्याचा गुणगौरव केला आहे.
आरोग्य सेविका श्रीमती तरूळे यांना पंतप्रधान मोदींनी गौरवल्याबदल शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना मा श्री. आशुतोष दादा काळे, साहेब तसेच मा श्री अशोकदादा काळे साहेब सौ पुष्पाताई काळे तसेच सौ.चैतालीताई काळे, मा श्री वाल्मिक आप्पा कोळपे तसेच सुरेगाव सरपंच श्री. शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच सचिन कोळपे ग्रामपंचायत सुरेगाव ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

