shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती, नगरपालिका निवडणुका राष्ट्रीय जनता दल स्वबळावर लढविणार : इम्रानभाई शेख



अहमदनगर (प्रतिनिधी) : नुकताच राज्यात नगरपंचायत,  नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असुन त्यात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीसह श्रीरामपूर, पाथर्डी,शेवगांव,जामखेड कोपरगांव,राहुरी, संगमनेर या सर्व नगर पालिका निवडणुका राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)  स्वबळावर लढविणार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव तसेच युवा नेते तथा बिहार विधानसभेतील विरोधीपक्ष नेते ना.तेजस्वीजी यादव यांच्या आदेशान्वये आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय कंदारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राजद सर्व निवडणुका लढविणार आहे,तसेच यानंतर होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समित्या, विधानसभा,लोकसभा सर्व निवडणुका राष्ट्रीय जनता दल संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरुन महाराष्ट्रातील सर्वच निवडणूका लढविणार आहे असल्याचेही शेवटी या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
close