वर्धापन दिनानिमित्त मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११ / ज्योती क्रांती मल्टी स्टेट करमाळा शाखेचा सोमवार दि. ११ जुलै रोजी ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्योति क्रांती शाखेतर्फे मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर डॉ. श्री तुषार गायकवाड, नगरसेवक श्री अतुल फंड, पत्रकार श्री सुर्यकांत होनप, श्री अमोल परदेशी, श्री शिवराज जगताप, श्री संग्राम देशमुख, श्री शहा, श्री बलदोटा,
सर्व व्यापारी मित्र, व खातेदार मध्ये श्रीमती आशा राठोड , csp धारक मध्ये श्री. नांगरे कृष्णा, श्री यशवंत वाघमारे, श्री वळेकर रवींद्र, तसेच एजंट मध्ये श्री मोरे सुदर्शन, श्री ढाळे निखिल, श्री कांबळे संतोष, प्रेरक मध्ये श्री मोरे अजिनाथ, व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री रफिक शेख सर यांनी संस्थेच्या व करमाळा शाखेच्या कामकाजाची माहिती दिली व मॅनेजर श्री ढाळे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

