shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आधार युथ फौंडेशनकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

समाजकारण व राजकारण यांची सांगड घालणारा माणूसच राजकारणात टिकून रहातो - प्रवीण माने.

आधार युथ फौंडेशनकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

इंदापूर प्रतिनिधी:अजित पवार  माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दिनांक २७ जुलै२०२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळा काझड व छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रविण  माने  माजी सभापती बांधकाम विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे व आधार  युथ फौंडेशन शिंदेवाडी चे संस्थापक अध्यक्ष सौरभ गणेश झगडे यांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्या व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.आधार युथ फौंडेशनच्या माध्यमातून वह्या व गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्रविण  माने म्हणाले, आधार फौंडेशनच्या माध्यमातून वह्या वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो खरोखर गोरगरीब मुलांच्यासाठी अतिशय चांगला उपक्रम आहे.समाजकारण व राजकारण यांची सांगड घालणारा माणूसच राजकारणात टिकून रहातो.सौरभ झगडे यांचे त्यांनी अभिनंदन केले . जि.प शाळेत शिकलेला विद्यार्थी कितीही अडचणी आल्या तरी तो संकटावर मात करतोच.जसे मांजर कुठून ही पडूद्या चार पायावर उभे रहाते. काझड शाळेचे भरभरुन कौतुक केले व मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.जि.प .शाळा काझड शाळेचे त्यांनी  तोंडभरुन कौतुक केले.
 या कार्यक्रमाची  सुरुवात भवानीनगर येथील जिल्हा परिषद शाळेतून झाली माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व छत्रपति सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे संचालक  गणेश झगडे यांचे हस्ते  झाली  व सणसर भवानीनगर,काझड,  शिंदेवाडी उद्धट ,तावशी यागावांसह आजूबाजूच्या पंचक्रोषीतील १६ गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवरील सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये तसेच माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुमारे १० हजारांपेक्षा जास्त वह्यांचे व गोरगरीब विद्यार्थ्यांना  गणवेश वाटप होणार आहे या कार्यक्रमासाठी काझड गावचे मा.उपसरपंच बापूराव पाटील ,माजी सरपंच राजेंद्र नरुटे ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सन्माननीय डी.एन .पांढरे सर,काझड  विविध  कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.नवनाथ नरुटे ,काझड  विविध  कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री.भिमराव  नरुटेपाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संतोष राजगुरु,उपाध्यक्षा सौ. राणी बापू शिंदे सदस्या सौ.सुनिता नवनाथ नरुटे ,सौ.पुजा जितुल धायगुडे माजी सदस्य श्री,पपेश खराडे ,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व आधार युथ फौंडेशनचे सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व पालक,सचिन झगडे,संदिप शिंदे ,नवनाथ शिंदे,नितीन झगडे,नितीन धायगुडे,विकास झगडे,संतोष झगडे,आशिष झगडे,वैभव टकले,पांडुरंग झगडे, काझड जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री,आदिनाथ धायगुडे व सर्व शिक्षक वृंद  छत्रपति हायस्कूल शिदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
close