shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाज संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेशजी विटकर यांचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे..,!

पुणे । प्रतिनिधी, दि.२९ जुलै:-
वडार समाजात सामाजिक काम करून‌ आपले वेगळेपण जपलेले,  तसेच कोरोना काळात हजारो गरीब कुटुंबांना धान्य किट वाटून प्रसिद्ध पावलेले वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष मा..श्री.राकेशजी विटकर यांनी आज दुपारी वडार वाडी मारुती मंदिर जवळ, शिवाजी नगर ,पुणे परिसरातील गरिब असलेल्या 300 कुटुंबाना रेशनकिट वाटप केले.

      राकेश जी विटकर यांनी समाजाला न्याय मिळावा ह्या हेतूने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वडार महामेळावे,चिंतन शिबीरे, वधू वर पालक परिचय मेळावे,अनेक गरिब विद्यार्थ्यांना पुण्याच्या महानगरपालिकेत वसतीगृहात संधी मिळवून देणे, समाजात जनजागृती, कोरोनात अनेकांना सहकार्य केले.समाज जागृती अभियान राबविणेसारखे उपक्रम राबविले आहेत. अशा अनेकविध कार्यक्रम आपली नोकरी सांभाळून करतांना राकेशजी विटकर‌ यांना समाजाने पाहिले आहे. आजही ते सामाजिक कामात व्यस्त असतात. त्यामुळे वडार समाजातील अनेक पदाधिकारी यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

         त्याचप्रमाणे वडार समाज संघाचे पदाधिकारी डॉ.श्रावण रॅपनवाड, जगन्नाथ फुलारे, रामचंद्र मंजूळे,अशोक कुलाल सर, महादेव कुसाळकर सर,संजय देवकर, बि. के. गायकवाड, दिलीप गुंजाळ, लक्ष्मण बामणे, मनोहर विटकर, श्रीकांत मुद्दे सर, रमेश जेठे, कैलास पवार व समाज बांधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. ,,!
close