shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वणी नगरवाचनालय व विदर्भ साहित्य संघ तर्फे कविकट्टा !



वणी-▪️किरण घाटे ▪️- वणी नगरवाचनालयात   कविकट्ट्याचे आयोजन  करण्यात आले होते .  वणीतील‌ कवियत्री  सुनंदा गुहे व युवाकवी सागर बरशेट्टीवार यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 


या कविकट्ट्याचे अध्यक्षस्थान सुपरिचित साहित्यिक तथा  प्राध्यापक  दिलीप अलोणे यांनी विभुषित केले होते .तर  या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणुन माधवकाका सरपटवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कवी‌ शंकर घुगरे यांनी केले उपस्थितीतांचे आभार  रवी बेलूरकर यांनी मानले. कार्यक्रमास वणीतील प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग होता.  नगरवाचनालयाचे सचिव गजानन  कासावार, राजाभाऊ  पाथर्डकर,प्राध्यापक अणे ,उत्तम गेडाम, डॉक्टर किशोर चवणे, चुंबळे  व नगर वाचनालय सभासदांच्या उपस्थितीत सदरहु कार्यक्रम पार पडला .
close