प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
करमाळा : ४ / करमाळा शहरातून जाणाऱ्या नाशिक त्रंबकेश्वर च्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आज मोफत चिक्की वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरचा कार्यक्रम करमाळा शहरातील बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आला होता .
करमाळा शहरातून जवळपास एक लाख वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतात यामधील सुमारे दीड हजार वारकऱ्यांना बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने मोफत फराळ चिक्की वाटप करण्यात आली.
बुधभूषण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दुरंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . मोफत चिक्की वाटपाचा कार्यक्रम बुधभूषण फाऊंडेशनचे व्हा चेअरमन दुर्गेश राठोड तसेच मार्गदर्शक आलीम शेख, संदीप चुंग यांच्या हस्ते मोफत चिक्की वाटप करण्यात आले. चिक्की वाटपाचा लाभ वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला .
तसेच पाथर्डी तालुक्यातील मढी,ढवळेचीवाडी येथील पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना बुधभूषण फाउंडेशन च्या पिशवी ,बॅग अविनाश राठोड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी फाउंडेशन सदस्य सत्यजित मडके, दीपक झोळे, सिध्दार्थ बदलानी, गणेश राठोड , अक्षय परदेशी, दीपक चिंचकर, जुनेद तांबोळी, यांनी परिश्रम घेतले .

