इंदापूर येथील अत्याधुनिक शीतल लेडीज ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपीचा उद्घाटन संपन्न.
सेंट्रल करेक्शन युनिव्हर्सिटी ऑफ मालावी मध्ये शितल खानेवाले यांनी गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथील शीतल लेडीज ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपीचा उद्घाटन शुभारंभ आज दिनांक २२जुलै २०२२ रोजी बँक ऑफ इंडिया व महालक्ष्मी बाजार शेजारी गोल्ड मेडलिस्ट सौ शितल सोमनाथ खानेवाले यांचे इंदापूर शहरांमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या ब्युटी पार्लरचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मिडास टच पुणे चे अंजली जोशी नीतू अरोरा यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर युवा उद्योजक अमोलराजे इंगळे, नगरसेवक अनिल राऊत, भाजप युवा मोर्चाचे राजेंद्र पवार, रामभाऊ जमदाडे, ,संजय देवकर, सुभाष डरंगे,सरपंच रुपाली अतुल झगडे, मंगेश वाघमोडे, माजी सरपंचउत्तम दरदरे , माजी सरपंच सुधीर गुटाळ, विजय नगरे ज्येष्ठ नेते, हवेल कनेरकर भाजप नेते, महाडिक बंकट, विलास आबा मारकड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई, कालिदास नगरे पत्रकार,अजित गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
कमल रामहरी खानेवाले व रामहरी हिरामण खानेवाले यांच्या आशीर्वादाने सौ.शितल सोमनाथ खानेवाले मिडास टच पुणे आयोजित सी. सी .यू .सेंट्रल करेक्शन युनिव्हर्सिटी (मालावी ) यांनी या कोर्ससाठी जगभरातील सहभागी ब्युटीसीन्स मध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे. हे ब्युटी पार्लर शितल खानेवाले हेच चालवणार असून या ब्युटी पार्लर च्या माध्यमातून इंदापूर शहर व तालुक्यातील ब्युटी पार्लर शिकणाऱ्या महिलांना तसेच ब्युटी पार्लर ची सेवा घेणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे ब्युटी पार्लर अत्याधुनिक सर्व सोयीनयुक्त असल्याचे शितल खानेवाले यांनी सांगितले.
उद्घाटनाप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सौ शितल खानेवाले यांनी गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल इंदापूरकरांच्यावतीने त्यांनी अभिनंदन केले व ब्युटी पार्लर व्यवसायास शुभेच्छा दिल्या.
तसेच मिडास टच चे अंजली जोशी यांनीही सौ. शीतल खानेवाले व सोमनाथ खानेवाले यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या. कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनीही खानेवाले परिवारास शुभेच्छा व्यक्त केल्या.
युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी शितल खानेवाले यांना गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल व लेडीज ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपी चे नवीन व्यवसायास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने व अमोल राजे मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.
मिडास टच हेअर अँड ब्युटी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पुणे व सी.सी. यु.मालावी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मेकअप कोर्समध्ये शितल खानेवाले यांनी गोल्ड मेडल पटकावले. इंदापूर तालुक्यातून या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या त्या एकमेव स्पर्धक होत्या. या यशाबद्दल बोलताना शितल खानेवाले म्हणाल्या की या ब्युटिक व्यवसायासाठी मला माझे पती सोमनाथ खानेवाले यांनी प्रोत्साहित केले त्यामुळे मी हे यश मिळवू शकले. पुण्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विविध प्रकारच्या फैंटसी लुक, मोनोक्रोमेटीक लुक, कल्चरल मेकअप, गोल्डन ग्लॅमरस लुक, महाराष्ट्रीयन लुक, इंडो वेस्टर्न लुक इत्यादी देशात व परदेशात चालणाऱ्या मेकअप कोर्सेस बद्दल यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
महिला करिअर विषयी बोलताना शितल खानेवाले म्हणाल्या की आधुनिक ज्ञानाचा उपयोग महिलांनी स्वतःच्या प्रगतीसाठी व राहणीमानासाठी करून घेतला पाहिजे. मेकअप क्षेत्रामध्ये भरपूर साऱ्या शाखा उपलब्ध असून त्यातून अर्थाजनही होऊ शकते व महिला स्वतःच्या पायावर उभी राहू शकते यासाठी महिलांनी या शाखेमध्ये येऊन ज्ञान घ्यायला हंव. त्यासाठी आम्ही शितल लेडीज ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपी या शाखेचे उद्घाटन इंदापूर मध्ये करीत आहोत. माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग महिलांसाठी करणार आहोत व महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत.

