shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम... भाजपा ओबीसी मोर्चाचे इंदापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आयोजन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम... भाजपा ओबीसी मोर्चाचे इंदापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आयोजन.
 
इंदापूर प्रतिनिधी : दि. २२ जुलै २०२२ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच सूचनेनुसार बेसुमार खर्चाला फाटा देऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा याचे पालन करून पांडुरंग शिंदे इंदापूर तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा यांच्या वतीने जय इन्स्टिट्यूट नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांना फळे वाटप व  उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
         यावेळी बोलताना पांडुरंग  शिंदे म्हणाले की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्याला असे सूचित केले होते की, वाढदिवसानिमित्त जाहिराती, बॅनर, होर्डिंग यावर होणारा खर्च टाळून समाजामध्ये जाऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा,आणि त्यांच्या सूचनेचे पालन करून आम्ही आज जय इन्स्टिट्यूट  नर्सिंग स्कूल मधील विद्यार्थिनींना फळाचे वाटप केले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना देखील फळे वाटप करण्यात आले . दुग्ध शर्करा योग म्हणजे आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पाळला व त्यांच्याच काळात ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ओबीसी आरक्षण लागू झाल्याने तसेच देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुरमु पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचा आनंद झाल्याने आज हा  उपक्रम राबवीत आहे व त्याचा आनंद देखील आहे.
  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर शहरात आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळा चे आयोजन करणार असल्याचे संकल्प करण्यात आला. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास  असल्याचे त्यांनी  सांगितले.
close