अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतराव पवार विद्यालय व प्राथमिक विद्यालय निरनिमगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतराव पवार विद्यालय व प्राथमिक विद्यालय निरनिमगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर चे ज्येष्ठ नेते श्री दत्ताजी घोगरे व उपाध्यक्ष रणजीत घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .
इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली .स्पर्धेचे विषय माझा आवडता नेता व संगणक शाप की वरदान असे होते.
लहान गटामध्ये २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर मोठ्या गटात २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ११००/-, ९००/-, ७००/- अशा रकमेचे पारितोषक संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे यांच्या तर्फे वितरित करण्यात आले.
यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गरगडे सर, श्री पिसे सर यांनी आयोजन केले. परीक्षक म्हणून श्री मोरे सर, साठे सर, मकर मॅडम,जाधव सर यांनी काम पाहिले. तसेच सूत्रसंचालन गवळी सर तर आभार जोशी सर यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .उत्कृष्ट भाषणासाठी श्री निकम पी एन व बळीराम हेगडे रोख बक्षीस दिले.

